अजिंक्य रहाणे (Photo Credit: AP/PTI)

IND vs AUS, 2nd Test: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) कार्यवाहक कर्णधार अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत यजमान संघाचा पहिला डाव 195 धावांवर गुंडाळला आणि आता पहिल्या डावात दमदार फलंदाजी करण्याची भारतीय संघाला संधी आहे. मात्र, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर टीम इंडियाने 195 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने दुपारच्या जेवणानंतर 4 विकेट गमावून 116 धावा केल्या असून कांगारू संघाच्या 79 धावांनी पिछाडीवर आहेत. कर्णधार रहाणेवर नेतृत्वासह फलंदाजीने देखील प्रभावी कामगिरी करण्याची जबाबदारी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे टेस्ट मॅच एमसीजी म्हणजे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) खेळला जात आहे. (IND vs AUS 2nd Test 2020: पदार्पणवीर शुभमन गिलची कमाल, ऑस्ट्रेलियामध्ये डेब्यू टेस्ट डावात सर्वोच्च धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सामील)

या मैदानावर आजवर फक्त सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार म्हणून शतक झळकावले आहे. सचिनने 1999 मध्ये हा पराक्रम केला होता आणि त्याने 116 धावांची खेळी केली होती. त्यानंतर एकही भारतीय कसोटी कर्णधाराला मेलबर्नमध्ये शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे, गेल्या 21 वर्षांपासून सचिनचा विक्रम अतूट असून आता मुंबईकर राहणेकडे सचिननंतर ही कमाल करण्याची सुवर्ण संधी आहे. सध्या टीम इंडिया कर्णधार रहाणे 67 चेंडूत 22 धावा करून खेळत असून कर्णधाराला साजेशी कामगिरी करण्याच्या प्रयत्नात तो असेल. यामागील एक कारण म्हणजे नियमित कर्णधार विराट कोहली पॅटर्निटी रजा घेत मायदेशी परतला आहे त्यामुळे, जर पहिल्या डावात संघाने चांगली धावसंख्या उभारली तर दुसर्‍या डावात कांगारू संघावर दबाव आणता येईल आणि ज्यानंतर भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा होऊ शकेल, परंतु यासाठी भारतीय फलंदाजांनी धावा करणे आवश्यक आहे तसेच कर्णधार रहाणेवर देखील मोठी जबाबदारी असेल.

रहाणेकडून यंदा अपेक्षा देखील आहे कारण त्याने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शतक झळकावले होते.  2014 मध्ये कांगारू संघाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात त्याने शतक झळकावले आणि 147 धावा केल्या.