विराट कोहली, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 1st टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs AUS 2020: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील पहिल्या पिंक-बॉल कसोटी सामन्याच्या तिसरा दिवसाचा खेळ सुरु आहे. तिसऱ्या दिवशी भारतीय दिग्गज फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे ढेर झाले आणि फक्त 19 धावांवर 6 विकेट गमावल्या. मागील सामन्यातील अर्धशतकवीर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील फ्लॉप ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडिलेड (Adelaide) टेस्टच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची हाराकिरी केली. भारतीय कर्णधार विराट देखील संघाचा डाव हाताळू शकला नाही. विराट दुसऱ्या डावात मोठी खेळी करू शकला नाही आणि फक्त 4 धाव करून माघारी परतला आणि 2008 नंतर पहिल्यांदा 2020 मध्ये एकही शंभरी गाठण्यात अपयशी ठरला.  विराटने पहिल्या टेस्ट सामन्यात पहिल्या डावात 74 धावा केल्या होत्या. लक्षात घेण्यासारखे म्हणजे विराटचा डाऊन अंडर दौऱ्यावर (India Tour of Australia) हा अंतिम सामना आहे कारण यानंतर तो मायदेशी परतणार आहे. (IND vs AUS 1st Test Day 3 Stats: टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवाने विराट कोहलीची 'ती' मालिका खंडित, पाहा पिंक-बॉल टेस्टच्या तिसऱ्या दिवसाचे प्रमुख आकडे)

विशेष म्हणजे, यंदा मर्यादित क्रिकेट खेळलेला विराट यंदा एकही शतक करू शकला नाही. विराट अद्याप टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्या शतकाच्या प्रतीक्षेत आहे तर यंदा खेळलेल्या आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात देखील विराट शतकी खेळी करू शकलेला नाही. यंदा कोरोना व्हायरसने प्रभावित झालेल्या क्रिकेटमध्ये भारताने मायदेशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि डाऊन अंडर वनडे मालिका खेळली आहे मात्र दोन्हीमध्ये तो शंभरी गाठू शकला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीने आतापर्यंत 251 सामन्यात 43 शतके केली आहेत. आता त्याच्या 12 वर्षांच्या कारकीर्दीतील ही दुसरी वेळ आहे जेव्हा एका वर्षात त्याच्या फलंदाजीला एकही शतक झळकावले नाही. दुसरीकडे, विराटने 86 कसोटी सामन्यात 27 शतके केली आहेत, मात्र यंदाच्या वर्षी तो शतकी धावसंख्या पार करू शकला नाही.

कोहलीने यंदा वनडेमध्ये 5 तर टी-20 मध्ये 1 अर्धशतक लगावले आहे तर कसोटी क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात केले. यासह रिकी पॉन्टिंग आणि सचिन तेंडुलकर यांचे विक्रम मोडण्याची विराटने गमावली. विराट आणि पॉन्टिंगने कर्णधार म्हणून 41 शतके केली आहेत तर एका शतकासह विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सचिन सर्वाधिक शतकांचा मागे टाकले असते. यंदाच्या कॅलेंडर वर्षात (न्यूझीलंडविरुद्ध) भारत फक्त एक कसोटी मालिका खेळला, जिथे कोहलीने एकूण 38 धावा केल्या.