IND vs AUS 1st Test Day 2 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅडिलेड टेस्ट मॅच लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast ची संपूर्ण माहिती
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 1st टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs AUS 1st Test Day 2 Live Streaming: भारत (India) आणि यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला दिवस/रात्र सामना अ‍ॅडिलेड ओव्हल (Adelaide Oval) मैदानावर खेळला जात आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरु होईल. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्स नेटवर्क आणि डीडी स्पोट्स वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIVवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (IND vs AUS 1st Test Day 1: विराट कोहलीचे दमदार अर्धशतक, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा अचूक मारा; भारत पहिल्या दिवसाखेर 6 बाद 233 धावा)

पहिल्या दिवशी भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि कर्णधार विराट कोहलीला वगळता अन्य फलंदाज प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरले. पहिला दिवसाचा खेळ अतिशय मनोरंजक ठरला. मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ या सलामी जोडीच्या अपयशानंतर कर्णधार कोहलीने चेतेश्वर पुजारा आणि मग अजिंक्य रहाणेसह डाव सावरला. या दरम्यान कोहलीने अर्धशतकी खेळी केली आणि 74 धावांवर रनआऊट होत माघारी परतला. रिद्धिमान साहा नाबाद 9 आणि आर अश्विन नाबाद 15 धावांपासून दुसऱ्या दिवशी खेळण्याची सुरुवात करतील. पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाने 6 विकेट गमावून 233 धावा केल्या होत्या. विराट वगळता पुजाराने 43 आणि उपकर्णधार रहाणेने 42 धावांचे योगदान दिले. पृथ्वी शून्यावर माघारी परतला तर मयंकने 17 आणि हनुमा विहारीने 16 धावा केल्या.

पाहा ऑस्ट्रेलिया-भारताचा अ‍ॅडिलेड कसोटीसाठीचा प्लेइंग इलेव्हन

भारत: मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया: टिम पेन (कॅप्टन/विकेटकीपर), जो बर्न्स, मॅथ्यू वेड, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, ट्रॅव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, आणि नॅथन लायन.