IND vs AUS 1st Test Day 1 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅडिलेड टेस्ट मॅच लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast ची संपूर्ण माहिती
विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: Getty)

IND vs AUS Test 2020-21: भारत (India) आणि यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका गुरुवारीपासून सुरू होणार आहे. अ‍ॅडिलेड (Adelaide) येथे दोन्ही संघांदरम्यान खेळला जाणारा हा पहिला कसोटी सामना डे-नाईट असणार आहे. भारतीय संघाने (Indian Team) बुधवारी संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली असून हा सामना विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध स्टीव्ह स्मिथ म्हणूनही मानला जात आहे. सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरु होईल तर नाणेफेक 9:00 मिनिटांनी होईल. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्स नेटवर्क आणि डीडी स्पोट्स वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIVवर चाहत्यानां लाइव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (IND vs AUS 1st Test: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात WTC पॉईंट्ससाठी चुरस, D/N टेस्टमध्ये कांगारू संघाची विजयी घोडदौड रोखण्याचे ‘विराटसेने’पुढे आव्हान)

भारतीय संघ पहिल्यांदा विदेशी भूमीवर पिंक-बॉल टेस्ट मॅच खेळणार आहे. मागील वर्षी बांग्लादेशविरुद्ध संघाने पहिल्यांदा दिवस/रात्र कसोटी सामना खेळला. दुसरीकडे, कांगारू संघ पिंक-बॉल टेस्टचा सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी आजवर सात दिवस/रात्र सामने खेळले असून सर्वांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे, कांगारू संघाची विजयी घोडदौड रोखण्याचे टीम इंडियापुढे खडतर आव्हान असणार आहे. सामन्यापूर्वी एकीकडे भारताने त्यांचा प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे तर ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेन टॉस दरम्यानच अंतिम-11 जाहीर करेल. मात्र, डेविड वॉर्नरच्या अनुपस्थितीत जो बर्न्स सलामीला येईल, तर विलो पुकोव्हस्की ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करेल अशी चर्चा आहे.

पाहा ऑस्ट्रेलिया-भारताचा कसोटी संघ

ऑस्ट्रेलिया: टिम पेन, पॅट कमिन्स, जो बर्न्स, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, मोइसेस हेनरिक्स, मार्नस लाबूशेन, नॅथन लायन, माइकल नेसर, जेम्स पॅटिनसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिशेल स्वीपसन, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर , सीन एबॉट आणि विल पुकोव्हस्की.

भारत: विराट कोहली (कॅप्टन), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह , मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि मोहम्मद सिराज.