टिम पेन आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

IND vs AUS 1st Test: यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतातील (India) स्पर्धा सर्वात जास्त चुरशीची कसोटी प्रतिस्पर्धा ठरली आहे आणि आयसीसीच्या महत्त्वपूर्ण वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप (ICC World Test Championship) स्पर्धेतील महत्त्वाच्या शर्यतींमुळे यंदाच्या लढत आणखी रोमांचक होईल. अ‍ॅडिलेड (Adelaide) येथे होणारी पहिली कसोटी ही परदेशी भूमीवर भारतासमोर पहिला दिवस/रात्र कसोटी खेळण्याचे आव्हान आहे. पहिल्या कसोटी सामन्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाआपले पहिले स्थान कायम इच्छित असतील तर भारतीय संघ पहिल्या स्थानावर झेप घेऊ पाहत असतील. 116.46 रेटिंग गुणांसह ऑस्ट्रेलिया क्रमवारीत अव्वल आहे तर भारत सध्या 0.750 रेटिंगसह दुसर्‍या स्थानावर आणि न्यूझीलंड 116.37 रेटिंग गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीची शर्यत वाढल्याने टीम इंडियाला नक्कीच दबाव जाणवत असेल. (IND vs AUS 1st Test Playing XI: अ‍ॅडिलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंक-बॉल कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन जाहीर, ‘या’ खेळाडूंना दिले स्थान)

अ‍ॅडिलेडमध्ये होणार पहिला दिवस/रात्र सामना जिंकून भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थान गाठण्याच्या प्रयत्नात असेल. तथापि, न्यूझीलंड त्यांच्यावर रेटिंगच्या जवळ पोहचत असल्याने भारतावर दबाव बनला आहे. न्यूझीलंडने घरच्या मैदानावर पाकिस्तानला 2-0 ने हरवले तर 5 मालिकांमधून त्यांचे 420 गुण असतील. अशा स्थितीत टीम इंडियाला अखेरच्या आठ कसोटी सामन्यांपैकी 5 किंवा 4 विजय आणि 3 अनिर्णता सामन्यांची गरज आहे. डाऊन अंडर दौऱ्यावर भारतीय संघ चार कसोटी सामन्यांची मालिका खेळेल, तर चेन्नई आणि अहमदाबाद येथे फेब्रुवारीपासून तितक्याच कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडचे आयोजन करणार आहे. इतकंच नाही तर 17 डिसेंबर म्हणजेच उद्यापासून सुरु होणाऱ्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची घोडदौड रोखण्याचे खडतर आव्हान देखील टीम इंडियापुढे असेल.

ऑस्ट्रेलियाने आजवर सात दिवस/रात्र कसोटी सामने खेळले असून सर्वांमध्ये ते अजेय राहिले आहेत. टिम पेनच्या कांगारू संघाने हे सर्व सामने घरच्या मैदानावर खेळले आहेत, त्यामुळे घरच्या मैदानावर कांगारुंचा पराभव करून त्यांना पहिल्या पराभवाची चव चाखणं भारतीय संघासाठी कठीण असणार आहे. म्हणूनच पहिला दिवस/रात्र सामना भारतीय संघाची खरी कसोटी असेल हे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.