IND v SA T20I 2022 Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून ठरणार विश्वचषकाचा संघ; कोण असेल बॅकअप ओपनर, मधल्या फळीत कोणाला तिकीट?
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

IND v SA T20I 2022 Series: आयपीएल संपल्यानंतर आता टीम इंडियाची (Team India) नजर ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर (T20 World Cup) असेल. आणि त्याची तयारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 T20 मालिकेपासून सुरू होईल. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून असे अनेक प्रश्न भारतीय संघासमोर (Indian Team) आहेत, ज्यांचे उत्तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत (South Africa Series) शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, जेणेकरून आतापासून टी-20 विश्वचषकाची टीम तयार करता येईल. टीम इंडिया 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळेल तेव्हा मधल्या फळीत कोणता फलंदाज फिट बसेल आणि टी-20 विश्वचषकाचे तिकीट मिळेल याकडेही संघ व्यवस्थापनाचे लक्ष असेल. भारतीय संघातील प्रत्येक जागेसाठी दावेदार अनेक आहेत. (IND vs SA 2022: टी-20 मालिकेत ‘हा’ स्टार खेळाडू भारतासाठी ठरेल ‘एक्स फॅक्टर’, 16 वर्षांचा अनुभव टीम इंडियासाठी बनेल फायदेशीर)

पहिला क्रमांक श्रेयस अय्यरचा आहे, ज्याने आयपीएल 2022 पूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत 28 चेंडूत नाबाद 57, 44 चेंडूत नाबाद 74 आणि 45 चेंडूत नाबाद 73 धावा केल्या होत्या. अय्यरने हे सर्व डाव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना खेळले. स्वत: अय्यरलाही वाटते की तीन नंबर हेच त्याच्या फलंदाजीसाठी सर्वोत्तम जागा आहे. पण सध्याचा फॉर्ममध्ये असलेला विराट कोहली टी-20 विश्वचषकात त्याच क्रमांकावर फलंदाजी करेल अशी शक्यता आहे. अय्यरनेही यापूर्वी चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी केली आहे, त्यामुळे तो क्रमवारीत फलंदाजी करू शकत नाही असे नाही. त्याला स्थिर व्हायला वेळ लागतो आणि त्यात सुधारणा करायची असते.

मधल्या फळीत कोणाला तिकीट?

मधल्या फळीत दीपक हुडा हा पुढील पर्याय असू शकतो. दीपकने आयपीएल 2022 मध्ये 136 च्या स्ट्राईक रेटने 451 धावा केल्या. महत्त्वाचे म्हणजे, त्याने 3 पासून सहाव्या स्थानापर्यंत सर्वत्र सारख्या सहजतेने फलंदाजी केली. त्याच्या बाजूने जाणारी आणखी एक गोष्ट म्हणजे तो आवश्यकतेनुसार गोलंदाजी करू शकतो. त्यानंतर सूर्यकुमार यादव आहे, जो सध्या हाताच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, परंतु तो पहिल्याच चेंडूपासून मोठे शॉट्स खेळू शकणारा 360-डिग्री फलंदाज आहे. याशिवाय राहुल त्रिपाठी आणि संजू सॅमसनही टीम इंडियाचा दरवाजा ठोठावत आहेत. अशा परिस्थितीत अय्यर आणि हुड्डा यांच्याकडे दक्षिण आफ्रिका मालिकेत संघातील स्थान पक्के करण्याची सुवर्णसंधी आहे.

चहलचा जोडीदार कोण?

आयपीएल 2022 मध्ये 27 विकेट्ससह युजवेंद्र चहलने भारताचा नंबर 1 टी-20 गोलंदाज म्हणून आपला दबदबा कायम ठेवला आहे. पण, अजून एका फिरकीपटूचा शोध संपलेला नाही. वर्षभरापूर्वीपर्यंत रवींद्र जडेजा या भूमिकेत फिट होता, पण आयपीएलमधील कमकुवत कामगिरी आणि त्यानंतर झालेल्या दुखापतीने उर्वरित गोलंदाजांसाठी दरवाजे उघडले आहेत. टीम इंडियाकडे अक्षर पटेलच्या रूपाने जडेजाचा पर्याय आहे. पण, जडेजाप्रमाणे अक्षर हा टी-20 क्रिकेटमध्ये विकेट घेणारा गोलंदाज नाही आणि त्याचा चेंडू चहलइतका फिरत नाही. जर एखाद्या संघात डावखुरे फलंदाज जास्त असतील तर ती अक्षर संघाची कमकुवत दुवा ठरू शकतो. अशा स्थितीत कुलदीप यादव योग्य पर्यंय आहे. कुलदीप विकेट घेणारा रिस्ट स्पिनर आहे आणि त्याच्या अॅक्शनमध्ये झालेल्या बदलामुळे तो पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक बनला आहे. तसेच रवी बिश्नोई देखील एक दावेदार असू शकतो. तो चहलसारखा लेगस्पिनर आहे पण, तो गुगली आणि लेग ब्रेक वेगाने फेकतो. या वर्षी फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने छाप पाडली होती.

बॅकअप ओपनरचा शोध

रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या बॅकअप सलामीवीरांचा शोध अजूनही सुरू आहे. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेत निवडकर्त्यांनी ईशान किशनला या भूमिकेसाठी निवडले, कारण तो मधल्या फळीतही फलंदाजी करू शकतो. मात्र, त्याच्या सध्याच्या फॉर्मने अडचणीत भर घातली आहे. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी त्याने निश्चितपणे 418 धावा केल्या पण, त्याचा स्ट्राइक रेट 120 होता आणि कार्तिकने विश्वचषक संघात स्थान मिळवले तर भारताला तिसऱ्या यष्टिरक्षकाची गरज भासणार नाही, कारण राहुल देखील टी-20 मध्ये ही भूमिका बजावू शकतो.

कोण जिंकेल वेगवान गोलंदाजाची शर्यत?

जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळत नाहीये. अशा स्थितीत उर्वरित गोलंदाजांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असेल. भुवनेश्वर कुमार लयीत असताना जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. आयपीएलचा 15वा हंगाम त्याच्यासाठी चांगला ठरला पण, वरिष्ठ गोलंदाज असल्याने त्याने सातत्याने चांगली कामगिरी करावी असे टीम इंडियाला अपेक्षित असेल. मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांच्या अनुपस्थितीत तो नवीन चेंडू हाताळू शकतो. डेथ ओव्हर्समध्येही तो चांगली गोलंदाजी करतो. दुसरीकडे जर आपण नवीन वेगवान गोलंदाजांबद्दल बोललो तर उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांनी आयपीएल 2022 मध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. उमरानने आपल्याच गतीने बड्या फलंदाजांचे दांडू उडवले तर, अर्शदीपने डेथ ओव्हरमध्ये फलंदाजांवर लगाम लावली. उल्लेखनीय म्हणजे डेथ ओव्हर्समध्ये त्याचा ७.५८ इकॉनॉमी रेट बुमराहच्या ७.३८ (किमान 10 ओव्हर्स) नंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. आता दोघांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर आयपीएलच्या यशाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे.