IND-A vs AUS-A Tour Match: ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) सुरुवातीपूर्वी भारत अ (India A) आणि ऑस्ट्रेलिया अ (Australia A) संघात तीन दिवसांच्या सराव सामन्याला आजपासून सुरुवात झाली. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारताचे तर ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. रहाणेने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारताने दिवसाखेर 8 विकेट गमावून 237 धावा केल्या आहेत. संघाची सलामी जोडी पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल गेलं झाल्यास रहाणेने चेतेश्वर पुजाराच्या साथीने प्रत्येकी अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. या सामन्यात भारतीय अ संघाची स्थिती खूपच वाईट दिसली, पण रहाणे आणि पुजाराच्या जोडीने संघाची लाज बचावली. कसोटी मालिकेपूर्वीच्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी भारत अ संघाचे दोन्ही सलामीवीर भोपळाही फोडू शकले नाही. दुसर्या षटकातील पहिल्याच चेंडूवर गिल गोल्डन डकवर माघारी परतला तर 6च्या एकूण धावांवर पृथ्वीही पॅव्हिलियनमध्ये परतला. (IND vs AUS 2nd T20I: भारताचा टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय, टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये झाले मोठे बदल)
यानंतर पुजारा आणि हनुमा विहारीने 34 धावा जोडल्या, पण विहारी 15 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार रहाणे आणि पुजाराने डाव नेला आणि 76 धावांची भागीदारी केली, पण पुजारा 140 चेंडूत 54 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. या दरम्यान, कर्णधार रहाणे एका टोकाला टिकून फलंदाजी करत राहिला परंतु दुसर्या टोकावरून संघाला नियमित अंतराने झटके लागत राहिले. मात्र रहाणेने एक मजबूत आणि संयमी खेळी खेळली व शतक झळकावले. रहाणेने 203 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकारासह आपले शतक पूर्ण केले. सराव सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर रहाणे 106 धावांवर नाबाद परतला तर पुजाराने 54 धावा केल्या. या खेरीज कोणताही फलंदाज मोठा डाव खेळू शकला नाही. सामन्याच्या दुसर्या दिवशी भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर पकड मिळवू शकतील की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका 17 डिसेंबर रोजी सुरु होणार आहे. पहिला सामना अॅडलेड येथे खेळला जाईल. हा सामना दिवस/रात्र सामना असेल. दोन्ही संघ पहिल्यांदा डे/नाईट कसोटी सामन्यात आमने-सामने येणार आहे.