
ICC T20 World Cup 2024: ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 मधील (T20 World Cup 2024) सुपर-8 चा (Super -8) थरार 19 जून पासून खेळवला जाणार आहे. ग्रुप स्टेजमधील 20 संघांने प्रत्येकी चार सामने खेळले असुन 8 संघांनी सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. सुपर-8 साठी भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज, अमेरिका आणि इंग्लंड पात्र ठरले आहे. तसेच, बांगलादेश सुपर-8 साठी पात्र होण्यासाठी शेवटचा संघ असु शकतो. दरम्यान, आयसीसीच्या वेळापत्रकानुसार, सुपर-8 मधील भारतीय संघाचे तीन सामने 20, 22 आणि 24 जून रोजी होणार आहेत. सुपर 8 मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. (हे देखील वाचा: T20 WC 2024 Super 8 Scenario: अफगाणिस्तानसह हे संघ सुपर-8 साठी पात्र, न्यूझीलंड-श्रीलंकेसह सहा संंघांना मिळाले घरचे तिकीट)
कुधी आणि कुठे पाहणार सामना?
भारत आणि अफगाणिस्तान यामधील सुपर-8 सामना बार्बाडोस येथे खेळवला जाणार आहे. चाहत्यांना हा सामना 20 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. तसेच, चाहत्यांना हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्टसवर पाहता येईल व मोबईमध्ये हॉटस्टारवर सामना विनामूल्य पाहण्याची मजा घेता येईल. भारताचा दुसरा सामना ऑस्ट्रलियासोबत 22 जूनला होणार आहे.
भारतीय संघाची जबरदस्त कामगिरी
टी-20 विश्वचषकात भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाचा सुपर 4 मधील शेवटचा सामना कॅनडासोबत शनिवारी होणार आहे. याआधी भारतीय संघांने तीन सामने खेळले असुन आर्यलडं, पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव केला आहे. भारताने गोलंदांजांच्या जीवावर हे तिन्ही सामने जिंकले आहे. आता शेवटच्या सामन्यात भारताला आपल्या फलंदांजीची लय मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल जो सुपर-8 च्या लढतीत फायदा मिळू शकेल.
भारत सुपर-8 मध्ये कधी आणि कोणासोबत खेळणार?
सुपर 8 मध्ये भारताचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध आहे. यानंतर टीम इंडियाचा सामना ड गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी होणार आहे. हा सामना 22 जून रोजी अँटिग्वा येथे होणार आहे. भारताचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना 24 जून रोजी सेंट लुसिया येथे होणार आहे. यानंतर स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना 26 जून रोजी तर दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी होणार आहे. अंतिम सामना 29 जून रोजी होणार आहे.