ICC World Cup 2019: विजय शंकर पायाच्या दुखापतीमुळे वर्ल्डकप मधून बाहेर; मयंक अग्रवाल ला संधी मिळण्याची शक्यता
विजय शंकर (Image credit: Getty)

भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात आयसीसी (ICC) विश्वकपमधील 38 वा सामना बर्मिंगहॅम (Birmingham) येथील एजबस्टन (Edgbaston) येथे खेळला गेला यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाला, या सामन्यात टीम इंडियाचा फलंदाज विजय शंकर (Vijay Shankar)  याला पायाच्या दुखापतीमुळे खेळता आले नव्हते तर त्याच्या जागी ऋषभ पंत (Rishabh Pant)  याला संघात स्थान मिळाले होते, मात्र आता विजय शंकर याच्या पायाची दुखापत वाढल्याने तो विश्वचषक स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडणार आहे. यापूर्वी भारताचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याला सुद्धा अंगठ्याला दुखापत झाल्याने अशा प्रकारे अर्ध्यावरच विश्वचषक दौऱ्याला रामराम करावा लागला होता. विजय शंकर याच्या जागी आता टीम इंडिया मध्ये मयंक अग्रवाल याला स्थान देण्यासाठी बीसीसीआयने (BCCI)  आयसीसीला (ICC)  लेखी विनंती केली आहे. (IND vs ENG, CWC 2019: विजय शंकरला जखमी सांगून बाहेर करणाऱ्या कोहली वर भडकला मुरली कार्तिक, म्हणाला 'दुखापत झालीय तर ड्रिंक्स कसा उचलतोय')

ANI ट्विट

या संदर्भात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने कालच्या सामन्याच्या टॉस आधी स्वतः माहिती दिली होती, तसेच त्याने विजयच्या खराब सादरीकरणावर होणाऱ्या कमेंट्स वर उत्तर दिले होते. " कधी कधी सामन्यांमध्ये तुमचं नशीब साथ देत नाही, पण यामधून बाहेर आल्यावर तुम्ही नक्कीच टीमसाठी मोठी कामगिरी करू शकता. विजय देखील अश्याच प्रकारे एक दिवस टीमसाठी मोठी कामगिरी करेल असा विश्वास दाखवून कोहलीने विजयची पाठराखण केली होती.

दरम्यान विजय शंकर याने पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध सामन्यातुन विश्वकप मध्ये पदार्पण केले होते. शंकरने पाकिस्तानविरूद्ध 15 धावा काढल्या होत्या तर 2 विकेट्स ही घेतले होते. मात्र, अफगाणिस्तान (Afghanistan) आणि वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध तो काही खास करू शकला नाही. अफगाणिस्तानाविरुद्ध शंकर 30 तर वेस्ट इंडीज विरुद्ध फक्त 14 धावा करत बाद झाला होता. शिवाय या दोन्ही सामन्यात विजयने गोलंदाजी केली नाही.