विश्वचषकात न्यूझीलंडने श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानला (PAK) उपांत्य फेरीत स्थान मिळवणे कठीण झाले आहे. पाकिस्तानचा पुढचा सामना इंग्लंडसोबत (PAK vs ENG) शनिवारी म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. हा सामना संघासाठी निर्णायक ठरणार आहे. जाणून घ्या पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी कोणत्या आव्हानांवर मात करावी लागणार आहे. पाकिस्तानने विश्वचषकातील 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत, तर तेवढेच सामने गमावले आहेत. संघाचा निव्वळ धावगती सध्या +0.036 आहे, ज्यासह ते पॉइंट टेबलमध्ये न्यूझीलंडपेक्षा पाचव्या स्थानावर आहेत. चौथ्या क्रमांकावर येण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकावा लागेल आणि किवींच्या तुलनेत त्यांचा निव्वळ धावगती सुधारण्याचे सर्वात मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
उपांत्य फेरी गाठायची असेल तर करावा लागेल चमत्कार
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना या सामन्यात इंग्लंडला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. या स्थितीत पाकिस्तानने 300 धावा केल्या तर त्यांना इंग्लंडला 13 धावाच्या आत गारद करावे लागेल. त्याचवेळी, पाकिस्तान संघाने कोलकातामध्ये 300 पेक्षा जास्त धावा केल्या तर त्यांना 287 किंवा त्याहून अधिक धावांचा फरक राखावा लागेल. या स्थितीत त्यांच्यासाठी फार कमी संधी असतील. (हे देखील वाचा: Dinesh Karthik Vijay Hazare Trophy 2023: टीम इंडियाचा फिनिशर फलंदाजाचे पुनरागमन, विजय हजारे ट्रॉफीमध्ये मिळाली मोठी जबाबदारी)
Qualification scenario for Pakistan:
Score 300, restrict England to 13.
Score 400, restrict England to 112.
Score 450, restrict England to 162.
Score 500, restrict England at 211. pic.twitter.com/dv6GFKbyf0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 9, 2023
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना प्रेक्षकांना मिळणे अशक्य
दुसरीकडे, इंग्लंडने प्रथम फलंदाजी केल्यास बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाला सुरुवातीच्या षटकांमध्येच खेळ संपवावा लागेल. अशा स्थितीत इंग्लंडचा डाव 100 धावांत आटोपला तरी त्यांना हे लक्ष्य केवळ 2.5 षटकांतच गाठावे लागेल. अखेरीस, पाकिस्तानची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारताचा उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना होऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना प्रेक्षकांना मिळणे शक्य वाटत नाही.
भारत-न्यूझीलंड उपांत्य फेरी
म्हणजेच आता पुन्हा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरी जवळपास निश्चित झाली आहे. भारतीय संघ आपला शेवटचा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार असला तरी अव्वल स्थानावर राहणार हे निश्चित आहे. न्यूझीलंडची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही परंतु आकडेवारीवरून ते जवळजवळ निश्चित मानले जाऊ शकते. त्यामुळे 2019 नंतर भारत आणि न्यूझीलंडचे संघ उपांत्य फेरीत पुन्हा आमनेसामने येतील. यावेळी टीम इंडिया बदला घेईल. हा सामना 15 नोव्हेंबर रोजी वानखेडे, मुंबई येथे होऊ शकतो.