ICC WTC Final: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (ICC World Test Championship Final) सामन्यात भारताचा (India) सामना न्यूझीलंडशी (New Zealand) होईल. हा महामुकाबला 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन (Southampton) येथे खेळला जाणार आहे. या बहुचर्चित सामन्यासाठी आयसीसी (ICC) आणि इंग्लंड बोर्ड जय्यत तयारी करत आहे. या सामन्याला काही दिवस शिल्लक असताना पाच दिवसांच्या या सामन्यासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितिवे मोठा अपडेट समोर आला आहे. तब्बल 4000 चाहत्यांना भारत-न्यूझीलंड संघातील फायनल सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये एंट्री दिली जाऊ शकते. बुधवार, 19 मे रोजी हॅम्पशायर आणि लीसेस्टरशायर (Hampshire vs Leicestershire) यांच्यातील इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिप सामन्यासाठी 1500 प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. हा सामना साऊथॅम्प्टन येथे खेळला जात आहे, जिथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. (ICC WTC Final: भारत-न्यूझीलंड महाअंतिम सामन्यापूर्वी Michael Vaughan यांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले- ‘हा’ संघ बनू शकतो टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता)
यूकेमध्ये कोविड-19 परिस्थिती सुधारली आहे अशास्थितीत सप्टेंबर 2019 नंतर इंग्लंडमध्ये पहिल्यांदा प्रेक्षकांच्या उपस्थितीत क्रिकेट सामना खेळला जात आहे. हॅम्पशायर काउंटी क्लबचे प्रमुख रॉड ब्रान्सग्रोव्ह यांनी क्रिकबझला सांगितले की इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आणि आयसीसी '4000' लोकांना बहुप्रतीक्षित सामन्यासाठी परवानगी देऊ शकते. “मला समजले आहे की 50 टक्के प्रेक्षक आयसीसीकडून प्रायोजक व इतर भागधारकांसाठी असेल आणि उर्वरित 2000 ची तिकिटे आम्ही विकणार आहोत. आम्हाला चाहत्यांकडून दुप्पट अर्ज मिळाला आहे,” ब्रान्सग्रोव्ह म्हणाले. सध्या दोन आठवडे मुंबईत क्वारंटाईन असलेला भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. त्यानंतर विराट कोहली आणि संघ साऊथॅम्प्टनमध्ये 10 दिवस क्वारंटाईन होईल परंतु त्यांना या काळात त्यांना प्रशिक्षणाची परवानगी मिळू शकते.
ब्रान्सग्रोव्ह म्हणाले, "आम्ही भारतीय संघ आपला क्वारंटाईन भारतात पूर्ण करुन येथे दाखल होण्याची वाट पाहत आहोत. आम्ही त्यांचे यजमानपद भूषवण्यासाठी तयार आहोत.” दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघ यजमान संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल तर टीम इंडिया फायनलनंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड आणि भारताने यापूर्वीचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे.