World Test Championship Points Table: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) पहिल्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात टीम इंडियाचा (Team India) दारुण पराभव करत ऑस्ट्रेलियाने (Australia) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. टिम पेनच्या नेतृत्वातील संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघाला शुक्रवारी 8 विकेट्सनी पराभूत करून चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आपल्या वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड आणि पॅट कमिन्स यांच्या शानदार गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाने भारताचा दुसरा डाव अवघ्या 36 धावांवर संपुष्टात आणला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पॉइंट टेबलच्या आपले पहिले स्थान बळकट केले आहे जे आता एकूण गुणांऐवजी जिंकलेल्या गुणांच्या टक्केवारीने निश्चित केले जात आहे. त्यामुळे, कमी गुण असूनही ऑस्ट्रेलिया भारतापुढे अव्वल स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचे 326 गुण असून त्यांची विजयी टक्केवारी 82.3% आहे. (IND vs AUS 1st Test 2020: जड अंतःकरणाने मायदेशी परतणार विराट कोहली, टीम इंडियाच्या पराभवावर हताश शब्दांत दिली प्रतिक्रिया)
दुसरीकडे, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत भारताला आणखी नुकसान झाले आहे. मालिकेच्या सुरुवातीला त्यांची टक्केवारी 75% होती तर पराभवानंतर ती 70.5% वर घासरली आहे. भारताने आजवर 10 टेस्ट मॅचपैकी 7 सामने जिंकले आहेत तर 3 सामन्यात त्यांचा पराभव झाला असून त्याचे 360 गुण आहेत. न्यूझीलंड, इंग्लंड आणि पाकिस्तान टॉप-5 मधील अन्य संघ आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतरही भारतीय संघ पॉइंट टेबलच्या दुसर्या क्रमांकावर तर न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबल येथे पाहा:
टीम | मॅच | विजय | पराभव | ड्रॉ | मालिका | पॉईंट्स | % |
ऑस्ट्रेलिया | 11 | 8 | 2 | 1 | 4* | 326 | 1.614 |
भारत | 10 | 7 | 3 | 0 | 5* | 360 | 1.804 |
न्यूझीलंड | 9 | 5 | 4 | 0 | 4 | 300 | 1.097 |
इंग्लंड | 15 | 8 | 4 | 3 | 4 | 292 | 1.223 |
पाकिस्तान | 8 | 2 | 3 | 3 | 4 | 166 | 0.853 |
श्रीलंका | 4 | 1 | 2 | 1 | 2 | 80 | 0.589 |
वेस्ट इंडीज | 7 | 1 | 6 | 0 | 3 | 40 | 0.493 |
दक्षिण आफ्रिका | 7 | 1 | 6 | 0 | 2 | 24 | 0.521 |
बांग्लादेश | 3 | 0 | 3 | 0 | 2 | 0 | 0.351 |
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट सिस्टमनुसार, दोन सामन्यांची मालिका जिंकल्यास संघाला 60 गुण, सामना बरोबरीत सुटल्यास 30 गुण आणि ड्रॉ साठी 20 गुण मिळतील तर पराभव झाल्यास एकही गुण मिळणार नाही. तीन सामन्यांच्या मालिकेत विजयासाठी 40 गुण, टायसाठी 20 गुण व बरोबरीसाठी 13 गुण दिले जातील. चार सामन्यांच्या मालिकेतील विजेत्या संघाला 30 गुण, बरोबरी झाल्यास 15 गुण आणि सामना अनिर्णित असल्यास 10 गुण मिळतील. शिवाय, पाच सामन्यांच्या मालिकेत विजयासाठी 24 गुण, टायसाठी 12 गुण व बरोबरीचे दोन्ही संघाला आठ गुण दिले जातील.