आयसीसी (ICC) विश्वकप मधील अपराजित भारतीय संघ संध्या आपल्या मैदानावरील खेळामुळे चांगलाच चर्चेत राहील आहे. आपल्या मागील सामन्यात टीम इंडिया ने वेस्ट इंडिज (West Indies) वर दणदणीत विजय मिळवत सेमीफायनल मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. भारताचा पुढील सामना यजमान इंग्लंड (England) शी एजबस्टन (Edgbaston) येथे होणार आहे. इंग्लंडविरुद्ध विजय मिळवत भारतीय संघ सेमीफाइनलमध्ये पोहचेल तर दुरीकडे पाकिस्तान (Pakistan) ची ही सेमीफायनलसाठी ची वाट सोप्पी करू शकतो. ही मॅच तिन्ही संघासाठी महत्वाची आहे. (ICC World Cup 2019: वेस्ट इंडिज मॅचमध्ये भारताच्या विजयाने सेमीफायनलची समीकरणे बदलली, पाकिस्तान खुश; जाणून घ्या काय आहे स्थती)
भारत (India) विरुद्ध इंग्लंड सामन्याआधी इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसेन (Naseer Hussain) ने पाकिस्तानी चाहत्यांवर एक मजेशीर ट्विट केले आहे. नासीर ने आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे पाकिस्तानी चाहत्यांना विचारले 30 जून ले होणाऱ्या मॅचमध्ये कोणाला सपोर्ट करणार. हे ट्विट करताच पाकिस्तानी चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया कधी न अपेक्षित असे उत्तर दिले. कोणी म्हणाले की भारत एक शेजारी देश आहे म्हणून त्याला पाठिंबा देणार, तर कोणी म्हटले की सेमीफायनलमध्ये भारत-पाक सामना बघायचा आहे म्हणून इंग्लंड ला हरवले पाहिजे.
Question to all Pakistan fans .. England vs INDIA .. Sunday .. who you supporting ? 😉
— Nasser Hussain (@nassercricket) June 26, 2019
Definitely backing India 🇮🇳 for two reasons
1- they’re neighbours
2- they’re passionate about cricket
— Rana Shazib (@RmShazib) June 26, 2019
Neighbors Support 😂✌😍😎 pic.twitter.com/QjwFT90Yp8
— Zunair Malik (@ZunairM54899844) June 26, 2019
We want semi- final with india 🇮🇳..
— Tahir Rana🇵🇰 (@iamtahirrana) June 26, 2019
Chalo bhai final krlo mgr ap log england ko haaro.. We are with with you 🇵🇰❤️🇮🇳
— Tahir Rana🇵🇰 (@iamtahirrana) June 26, 2019
1947 : Divided by England
2019 : United by England #CricketWorldCup19 https://t.co/tRiNTsVaZf
— Justabhi (@justabhii) June 27, 2019
We support England’s defeat 😛
— Siasat.pk (@siasatpk) June 26, 2019
इतकेच नाही तर इंग्लंडच्या माजी कर्णधार केव्हिन पीटरसन (Kevin Pierterson) ने ही या ट्विटचा आनंद घेत नासीर यांना तुम्ही कोणत्या संघाचे समर्थन करायचे असे विचारले. ज्यावर नासीर यांनी पीटरसन ला एक मजेदार उत्तर दिले.
Who you supporting, Nass?
— Kevin Pietersen🦏 (@KP24) June 26, 2019
England of course Kev .. same as you when England play South Africa at rugby 😉
— Nasser Hussain (@nassercricket) June 26, 2019
रविवारी होणाऱ्या सामन्यात जर भारताने इंग्लंड संघाचा पराभव केलं तर याचा फायदा पाकिस्तान ला होणार आहे. यजमान इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलिया (Australia), पाकिस्तान आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्याकडून मिळालेल्या पराभवामुळे मोठा फटका बसला आहे. 8 गुणांसह इंग्लंड सध्या चौथ्या क्रमांकावर आहे, तरी त्यांचे सेमीफायनलमधील स्थान धोकादायक आहे. इंग्लंडचे विश्वकप मधील दोन सामने बाकी आहे. इंग्लंडसाठी दोन्ही सामने करो या मारो आहे. इंग्लंड ने एक सामना गमावलास आणि पाकिस्तान ने आपले दोन सामने जिंकले तर पाकिस्तानी संघ सेमीफाइनलमध्ये पोहचू शकतो.