ICC World Cup 2019: विश्वकपमध्ये चार शतक करणाऱ्या 'हिटमॅन' रोहित शर्मा चा अमूलकडून गौरव, पहा हे मजेदार Tweet
(Photo Credit: Twitter)

बांग्लादेश (Bangladesh) संघाचा पराभव करत विराट कोहली (Virat Kohli) च्या टीम इंडिया ने आयसीसी विश्वकप च्या सेमीफायनलमध्ये दमदार प्रवेश केला आहे. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) ची शतकी खेळी आणि गोलंदाजांच्या मारक बॉवलिंगच्या जोरावर भारताने बांग्लादेशचा 28 धावांनी पराभव केला. यंदाच्या विश्वकपमध्ये रोहितने चार शतक ठोकले आहे. रोहितने बांग्लादेशविरुद्ध 104 धावांची खेळी केली आणि संघाला विजयाच्या जवळ नेऊन उभे केले. अमूल (Amul) ने आपल्या खास अंदाजात रोहितच्या चार शतकांचे कौतुक करत त्याचा गौरव केला आहे. (ICC World Cup 2019: रिषभ पंत याच्या बाबत ही गोष्ट आहे टीम इंडियासाठी चिंतेची बाब)

अमूलने आपल्या ट्विटर अकाउंट वर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपले शतक साजरे करतानाच्या पोज मध्ये दिसत आहे. फोटोमध्ये दिलेली पोज रोहितने पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध मारलेल्या शतकानंतर ची आहे. अमूलने फोटो शेअर लिहिले, "रोहित शर्मा, विश्वकपमध्ये चार शतक करणारा पहिला भारतीय!" बांग्लादेशविरुद्ध सामन्यात रोहितने विश्वकपमध्ये 500 धावा पूर्ण केल्या. यंदाच्या विश्वकपमध्ये त्याने ऑस्ट्रेलिया च्या डेविड वॉर्नर ला मागे टाकून 532 धावा केल्या आहेत. वॉर्नर ने आतापर्यंत 516 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये 500 पेक्षा जास्त धावा करणारा दुसरा भारतीय आहे. याआधी सचिन तेंडुलकर ने 1996 आणि 2003 मध्ये ही कामगिरी केली होती.

दरम्यान, अमूलने आणखी एक फोटो शेअर केला आहे. यात अमूल इंडियाने टीम इंडियाच्या 87 वर्षीय फॅन चारुलता पटेल (Charulata Patel) यांना दर्शविले आहे. या फोटोमध्ये पटेल टीम इंडियाला प्रोत्साहन देताना दर्शविले आहे. अमूलने लिहिले, "भारतीय संघाला प्रोत्साहन देणाऱ्या 87 वर्षीय 'सुपर फॅन' सोशल मीडियावर हिट."