ICC Women's World T20 2018 : महिला क्रिकेट संघाला रोहित शर्माने दिल्या शुभेच्छा (Video)
रोहित शर्मा (Photo: Getty Images)

आयसीसी वुमन वर्ल्ड कप टी 20 आजपासून वेस्टइंडिजमध्ये सुरु होणार आहे. यात सहभागी होणाऱ्या दहा टीमपैकी भारत एक आहे. महिला क्रिकेट संघाचा पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध रंगणार आहे. आतापर्यंत एकदाही भारतीय महिला क्रिकेट संघाने टी20 कप जिंकलेला नाही. पण यंदाचे महिला संघाचे खेळ चांगला व्हावा, यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा सामनावीर रोहीत शर्माने महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

रोहितने शुभेच्छांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यात रोहित म्हणतो की, "महिला क्रिकेट संघाला खूप शुभेच्छा. आज न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी मी अत्यंत आशावादी आहे आणि मला खात्री आहे की, त्या आपल्या देशासाठी गौरवास्पद कामगिरी करतील. ऑल द व्हेरी बेस्ट."

या व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत रोहितने लिहिले की, "ICC #WT20 आजपासून सुरु होत आहे आणि आपण सर्व या मुलींच्या पाठीशी आहोत."

आयसीसी विश्व टी -20 च्या 2009 आणि 2010 मधील उपांत्यपूर्व फेरीच्या अंतिम सामन्यात पहिल्या दोन आवृत्त्यांमध्ये या महिलांनी उत्तम कामगिरी केली होती.