भारतीय महिला क्रिकेट संघाची धुवादार फलंदाज मिताली राज हिने भारतीय पुरुष संघाचा सलामीवीर रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावे होता. मात्र मिताली राजने तो मोडला आहे. मिताली राजने 2232 धावांचा पल्ला पार करत महिला आणि पुरुष संघात सर्वोच्च स्थानी पोहचली आहे. हा रेकॉर्ड तिने रविवारी महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात केला.
यापूर्वी हायवोल्टेज मॅचमध्ये मिताली राजने 47 चेंडूत 56 धावा केल्या होत्या. तर स्मृती मंदाना 28 चेंडूत 73 धावांची पार्टनरशिप करत खेळाची चांगली सुरुवात केली. न्युझीलँडविरुद्धच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाबाद 14 धावा केल्या. त्यामुळे भारताला 137 धावांचे लक्ष्य गाठणे सोपे झाले.
यावर तिने सांगितले की, मी खेळाचा आनंद घेत आहे. तीन नंबरवर फलंदाजी करणे खूप आवडते. असे जरी असले तरी भारतीय महिला क्रिकेट टीमच्या फिल्डिंगबद्दल तिने नाराजी व्यक्त केली.