पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Photo Credit: Twitter)

मुंबई: पुढील 72 तास पाकिस्तानसाठी (Pakistan) खूप कठीण असू शकतात. रिपोर्टनुसार, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy) यजमानपदापासून पाकिस्तान वंचित राहू शकतो. 19 ते 22 जुलै दरम्यान श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत याची घोषणा केली जाऊ शकते. वास्तविक, भारत कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात जाण्यास तयार नाही. टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार घेतल्यास संपूर्ण स्पर्धाच अडचणीत येऊ शकते. अशा स्थितीत आयसीसी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानऐवजी अन्य कोणत्या तरी देशात करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी आता श्रीलंका किंवा दुबईमध्ये खेळवली जाऊ शकते. (हे देखील वाचा: Team India T20I Captain: गौतम गंभीरच्या बोलण्यातून स्पष्ट झालं! हार्दिक नाही तर सूर्यकुमार यादवच होणार पुढचा टी-20 कर्णधार - रिपोर्ट)

आता संपूर्ण स्पर्धा दुबई किंवा श्रीलंकेत होऊ शकते

तथापि, याआधी 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवली जाईल असे अहवाल आले होते. हायब्रीड मॉडेल अंतर्गत, टीम इंडियाने आपले सामने पाकिस्तानऐवजी अन्य कोणत्यातरी देशात खेळले असते. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने श्रीलंका किंवा दुबईत खेळू शकते, असेही बोलले जात होते. मात्र, आता संपूर्ण स्पर्धा दुबई किंवा श्रीलंकेत होऊ शकते.

या देशांचा भारताला पाठिंबा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखे मोठे देशही भारताच्या या निर्णयाचे समर्थन करत आहेत. अशा स्थितीत आयसीसीच्या बैठकीत या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे ठिकाण बदलण्याच्या भारताच्या मागणीला इतर अनेक देशही पाठिंबा देऊ शकतात.

आशिया चषक हा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळला गेला

यापूर्वी 2023 आशिया कपचे यजमानपदही पाकिस्तानकडे होते. मात्र, टीम इंडियाने आशिया कपसाठी पाकिस्तानला जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवण्यात आली. 2023 आशिया कपमध्ये भारताने आपले सामने श्रीलंकेत खेळले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही श्रीलंकेत खेळला गेला होता.