आयसीसीची (ICC) ताजी क्रमवारी जाहीर करण्यात आली असून त्यात भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) जबरदस्त झेप घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध (WI) खेळल्या जात असलेल्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने धडाकेबाज अर्धशतक झळकावून सर्वोत्तम रँकिंग गाठले आणि दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या पहिल्या क्रमांकावर असला तरी त्याची खुर्ची लवकरच हिसकावून घेतली जाणार आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवला फायदा झाला आहे. त्याने चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. 816 गुणांसह तो नंबर वन पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या अगदी जवळ आला आहे. बाबरचे 818 गुण आहेत आणि आता तो त्याची जागा गमवू शकतो. भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध आणखी दोन टी-20 सामने खेळायचे आहेत, तर पाकिस्तान संघ नेदरलँडविरुद्ध एकदिवसीय सामने खेळणार आहे, त्यानंतर त्यांना थेट आशिया कपमध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये खेळायचे आहे.
Tweet
🔹 Suryakumar's rapid rise
🔹 Hosein makes big gains
🔹 Markram breaks into the top 🔟
Some big movements in the @MRFWorldwide ICC Men's T20I Player Rankings 📈
— ICC (@ICC) August 3, 2022
ICC T20 फलंदाजी क्रमवारी
ताज्या क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर 818 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव त्याच्या दोन गुणांनी मागे असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. खराब फॉर्मशी झुंजत असलेला पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान 794 गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्कराम 788 गुणांसह क्रमवारीत घसरला आहे. इंग्लंडचा डेव्हिड मलान 731 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. (हे देखील वाचा: Asia Cup 2022: आशिया चषकाची मजा तिपटीने वाढणार, भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडण्याची शक्यता, घ्या जाणून)
सुर्यकुमारनं दाखवली कमाल
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारत 2-1 नं आघाडीवर आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध काल खेळण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सुर्यकुमार यादवनं 44 चेंडूत 76 धावांची दमदार खेळी केली. या सामन्यासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. ज्याचा फायदा त्याला आयसीसी टी-20 क्रमावारीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.