आयसीसीने नुकतीच टी-20 क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला नुकसान सोसावे लागले आहे. मात्र सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांची ताकद कायम आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. इंग्लंडचा सर्वोत्तम खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन अव्वल स्थानी आला आहे. तर पांड्याची एका स्थानावर घसरण झाली आहे. ऋतुराज गायकवाड नवव्या क्रमांकावर कायम आहेत. गोलंदाजांच्या T20 क्रमवारीत अव्वल 10 मध्ये एकही भारतीय नाही. (हेही वाचा - : आयसीसी टी-20 क्रमवारीत भयानक उलथापालथ, लियाम लिव्हिंगस्टोनने पटकावले अव्वल स्थान)
हार्दिकने अनेक प्रसंगी टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे. पण सध्याच्या टी-20 क्रमवारीत त्यांची एक स्थान घसरली आहे. पंड्या याआधी सहाव्या स्थानावर होता. मात्र आता तो सातव्या क्रमांकावर आला आहे. अष्टपैलूंच्या T20 क्रमवारीत पंड्या हा एकमेव भारतीय आहे, जो पहिल्या 10 मध्ये कायम आहे. इंग्लंडचा लिव्हिंगस्टोन अव्वल स्थानावर आहे. त्याने सात स्थानांनी झेप घेतली आहे. मार्कस स्टॉइनिस दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर झिम्बाब्वेचा सिकंदर रझा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पाहा पोस्ट -
England and Australia stars receive a massive boost in the latest ICC Men’s T20I Player Rankings 💥
More ➡️ https://t.co/DagmLiEpUf pic.twitter.com/2DBWGmBsvc
— ICC (@ICC) September 18, 2024
यशस्वी-सूर्याची स्थिती बदललेली नाही -
टी-20 फलंदाजी क्रमवारीत पाहिल्यास सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. ट्रॅव्हिस हेड शीर्षस्थानी आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी चौथ्या क्रमांकावर कायम आहे. त्यांच्या जागेत कोणताही बदल झालेला नाही. इंग्लंडचा फिलिप सॉल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा खेळाडू ऋतुराज नवव्या क्रमांकावर आहे. त्यांचे स्थानही बदललेले नाही. बाबर आझम पाचव्या तर मोहम्मद रिझवान सहाव्या स्थानावर आहे.
पहिल्या 10 गोलंदाजांच्या क्रमवारीत एकही भारतीय नाही -
जर आपण T20 बॉलिंग रँकिंगवर नजर टाकली तर टॉप 10 मध्ये एकही भारतीय नाही. यामध्ये इंग्लंडचा आदिल रशीद अव्वल स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचा अकिल हुसेन दुसऱ्या स्थानावर आहे. तर राशिद खान तिसऱ्या क्रमांकावर आहे.