ICC ची क्रिकेट चाहत्यांना अनोखी भेट; 8 वर्षात रंगणार 10 वर्ल्ड कप स्पर्धा तर चॅम्पियन्स ट्रॉफीचे होणार पुनरागमन, जाणून घ्या आयसीसीचे सर्व मोठे निर्णय
आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2020 ट्रॉफी  (Photo Credits: Getty Images)

आयसीसी क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) मंगळवारी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. आयसीसीने पुढच्या 8 वर्षांसाठी फ्यूचर टूर्स प्रोग्राम (एफटीपी) तयार केला असून यंदा भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयला थोडा दिलासा दिला आहे. या बैठकीत आयसीसीने असे अनेक निर्णय घेतले जे क्रिकेट चाहत्यांसाठी एक गुड-न्यूज म्हणून समोर आले आहेत. आयसीसीच्या फ्यूचर टूर्स प्रोग्रामनुसार 2024 ते 2031 दरम्यान 4 टी-20 विश्वचषक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 20 संघ भाग घेतील. या व्यतिरिक्त 2 एकदिवसीय विश्वचषकांचे आयोजन केले जाईल ज्यात एकूण 14 संघांचा समावेश असेल. या दरम्यान 2 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 4 विश्व टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा देखील आयोजित केली जाईल. 1992 वर्ल्ड चॅम्पियन्स पाकिस्तान 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा बचाव करतील. (T20 World Cup: भारतामध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी BCCI ला 28 जूनपर्यंतची मुदत)

आयसीसीने पूर्वी रद्द केलेली चॅम्पियन्स करंडक पुढील आठ वर्षांच्या चक्रात 2023 पासून सुरू होऊन 2031 पर्यंत खेळली जाईल. आयसीसी बोर्डाच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले, “आयसीसी बोर्डाने आज 2024 ते 2031 या कालावधीचे वेळापत्रक निश्चित केले ज्यामध्ये पुरूष क्रिकेट वर्ल्ड कप आणि टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जाईल आणि चॅम्पियन्स करंडक पुन्हा आयोजित करण्यात येईल.” आयसीसी महिला स्पर्धेचे वेळापत्रक यापूर्वीच निश्चित झाले आहे. यंदा टी-20 वर्ल्ड कपमध्ये 16 संघ असतील. सध्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण दहा सहभाग घेतात. पुरुषांच्या विश्वचषकात प्रत्येकी सात संघांचे दोन गट असतील आणि पहिल्या तीन संघ सुपर सिक्समध्ये प्रवेश करतील. यानंतर सेमीफायनल आणि फायनल फेरी होईल. 2003 मध्ये झालेल्या विश्वचषकात हेच स्वरूप आहे. दुसरीकडे, टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाच संघाचे चार गट असतील. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. यानंतर सेमीफायनल व नंतर फायनल सामना खेळला जाईल.

आयसीसी बोर्डाने पुढील फेरीतील सर्व पुरुष, महिला आणि अंडर -19 स्पर्धेचे यजमानपद निश्चित करण्याच्या प्रक्रियेसही मान्यता दिली. सप्टेंबर महिन्यात पुरुषांच्या स्पर्धेच्या यजमानांची निवड केली जाईल तर महिला स्पर्धा आणि टी-20 स्पर्धेच्या यजमानांची निवड नोव्हेंबर महिन्यात होईल. एका अधिकृत प्रसिद्धीमध्ये ICC ने हा खुलासा केला आहे की टी-20 वर्ल्ड कपचा विस्तार 20 संघात करण्यात आला आहे आणि प्रतिष्ठित स्पर्धा 2024, 2026, 2028 आणि 2030 मध्ये 55 सामन्यांची असेल.