Mohammed Siraj vs Travis Head: ॲडलेड कसोटी (Adelaide Test) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि ट्रॅव्हिस हेड (Travis Head) यांच्यात वादावादी झाली. ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर सिराजने त्याला मैदान सोडण्यास सांगितले. त्याचवेळी ट्रॅव्हिस हेडही त्याला रागाने काहीतरी बोलताना दिसला. या घटनेवर आयसीसीने (ICC) दोन्ही खेळाडूंना कठोर शिक्षा सुनावली आहे. आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.5 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर सिराजला त्याच्या मॅच फीच्या 20% दंड ठोठावण्यात आला आहे. हेडला आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.13 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी मानले आहे.
दोन्ही खेळाडूंना देण्यात आला एक डिमेरिट पॉइंट
सिराज आणि हेड यांना प्रत्येकी एक आला आहे. गेल्या 24 महिन्यांतील त्याचा हा पहिला गुन्हा होता. दोन्ही खेळाडूंनी आपला गुन्हा कबूल केला असून सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी ठोठावलेला दंडही मान्य केला आहे. (हे देखील वाचा: WTC 2025 फायनलच्या शर्यतीत 'हे' चार संघ कायम, जाणून घ्या भारतासह सर्व देशांचे समीकरण)
Mohammed Siraj and Travis Head have been penalised following their on-field incident during the second Test in Adelaide 👀 #WTC25 | #AUSvIND | Full details 👇https://t.co/IaRloqCln2
— ICC (@ICC) December 9, 2024
नंतर दोघांमध्ये वाद मिटला
या वादानंतर ट्रॅव्हिस हेडने सांगितले होते की, त्याने सिराजला चांगली गोलंदाजी केल्याचे सांगितले होते. यानंतरही तो आक्रमक झाला. तसेच, हेड असे काही बोलले नसल्याचे सिराजने सांगितले होते. तो खोटं बोलत आहेत. मात्र, या वादानंतर दोन्ही खेळाडू मैदानावर बोलतानाही दिसले. याशिवाय सामना संपल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारली.
'हेड' नेहमी भारतासाठी ठरतो डोकेदुखी
ॲडलेड कसोटी सामन्यात ट्रॅव्हिस हेड टीम इंडियाचा नेहमीप्रमाणे डोकेदुखी ठरला आहे. त्याने 141 चेंडूत 17 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 140 धावा केल्या. मोहम्मद सिराजने त्याला बोल्ड करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला होता.