आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2024 चे यजमानपद अमेरिकेला (USA) मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण ही स्पर्धा 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये (Los Angeles Olympics) क्रिकेटचा समावेश करण्याच्या ICC च्या मोहिमेत ‘लाँच पॅड’ म्हणून काम करू शकते. अमेरिका क्रिकेट (USA Cricket) आणि क्रिकेट वेस्ट इंडिज यांच्या एकत्र यजमानपदासाठी आयसीसी (ICC) संयुक्त बोली निवडेल अशी अपेक्षा आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील एका अहवालानुसार, “आयसीसी स्पर्धेच्या पुढील आवृत्तीच्या ठिकाणांबाबत निर्णय जवळ आला आहे आणि जागतिक लक्ष याचा अर्थ अलीकडच्या काळापेक्षा अधिक प्रमाणात वितरीत केले जाईल.” अशा स्थितीत जर सर्व काही योजनेनुसार झाले तर बांगलादेशात 2014 टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर भारत किंवा इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्याद्वारे आयोजित न होणारी ही पहिली जागतिक स्पर्धा असेल.
ICC अनेक दिवसांपासून उदयोन्मुख देशांना स्पर्धा आयोजित करण्याचा अधिकार देण्याचा विचार करत आहे. 2024 टी-20 विश्वचषक स्पर्धेत 20 संघ सहभागी होण्याची अपेक्षा आहे ज्यामध्ये 2021 आणि 2022 टप्प्यांच्या तुलनेत 55 सामने (16 संघांमधील 45 सामने) खेळला जातील. आयसीसी 2024 ते 2031 दरम्यान अनेक जागतिक स्पर्धांचे आयोजन करेल, ज्याची सुरुवात 2024 टी-20 विश्वचषकने होईल. या ऑस्ट्रेलियन दैनिकाच्या वृत्तानुसार, “या महत्त्वाच्या टप्प्यासोबतच 2024 च्या स्पर्धेचे यजमानपद म्हणून अमेरिकेची निवड केल्याने ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2028 लास एंजेलिस ऑलिम्पिक नंतर 2032 ब्रिस्बेन पर्यंत चालू ठेवणार आहे.” सध्या अमेरिका आयसीसीचा सहयोगी सदस्य आहे. दरम्यान 2015 ते 2023 बद्दल बोलायचे तर मोठे कार्यक्रम फक्त भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया देशात आयोजित केले गेले.
दुसरीकडे, अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकामुळे फक्त ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होण्याचा मार्ग मोकळाच होणार नाही, तर अमेरिकेत क्रिकेटचा विस्तारही होईल. अमेरिकेतही क्रिकेट खेळाला चालना मिळणार आहे. यामध्ये अमेरिकेचा क्रिकेट संघ नक्कीच आहे, पण त्यात इतर देशांतील अनेक खेळाडूंचा सहभाग आहे.