
Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants: आयपीएल 2025 (IPL 2025) सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants) यांच्यात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) येथे खेळला जात आहे. सनरायझर्स हैदराबादने आपला पहिला विजय निश्चित केला आहे, तर लखनौ सुपर जायंट्सला पराभव पत्करावा लागला. अशा परिस्थितीत, लखनौ संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असेल. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. दरम्यान, लखनौने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने लखनौसमोर 191 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
A strong T20 score, but underwhelming for SRH? 👀 pic.twitter.com/euoIC5VPw5
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 27, 2025
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने 20 षटकात 9 गडी गमावून 191 धावा केल्या. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडने 47 धावांची शानदार खेळी केली. त्याने 26 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. त्याच्याशिवाय नितीश कुमार रेड्डीने 32 तर अनिकेत वर्माने 36 धावांचे योगदान दिले.
दुसरीकडे, स्टार गोलंदाज शार्दुल ठाकुरने लखनौ सुपर जायंट्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. लखनौ सुपर जायंट्स शार्दुल ठाकुरने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकुर व्यतिरिक्त आवेश खान, दिग्वेश राठी, रवी बिश्नोई आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.