
Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans, 19th Match: टाटा आयपीएल 2025 चा (TATA IPL 2025) 19 वा (Indian Premier League 2025) सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) खेळवला जात आहे. सनरायझर्स हैदराबादची कमान पॅट कमिन्सच्या खांद्यावर आहे, तर गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. दरम्यान, गुजरातने टाॅस जिकंन घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने गुजरातसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Just TWO sixes in the whole innings!
On slightly slower pitch, SRH somehow manage to go past 150 🎯 https://t.co/qW4672qz58 #IPL2025 #SRHvGT pic.twitter.com/ReUlL85odw
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 6, 2025
नितीश कुमार रेड्डीची 31 धावांची सर्वाधिक खेळी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने 20 षटकात 8 गडी गमावून 152 धावा केल्या. हैदराबादकडून नितीश कुमार रेड्डीने 31 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याने 34 चेंडूत 3 चौकार मारले. त्याच्याशिवाय हेनरिक क्लासेनने 27 धावांचे योगदान दिले. गुजरातला हा सामना जिंकण्यासाठी 153 धावा करायच्या आहेत.
मोहम्मद सिराजची घातक गोलंदाजी
दुसरीकडे, मोहम्मद सिराजने गुजरात टायटन्सला संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. गुजरात टायटन्स संघाकडून गोलंदाजीत मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 गडी बाद केले. त्याच्याशिवाय प्रसीध कृष्ण आणि रविश्रीनिवासन साई किशोरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.