
Asia Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आशिया चषक (Asia Cup) वनडे फॉरमॅटच्या इतिहासात अपवादात्मक कामगिरी केली आहे. यावेळी आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जाईल, जो 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. रोहित शर्मा आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. रोहित शर्माच्या भक्कम आकडेवारीवर एक नजर टाकूया. (हे देखील वाचा: Team India Fitness Test: आशिया चषकापूर्वी खेळाडूंच्या फिटनेसवर बीसीसीआयचा भर, विराट, रोहितसह सर्वांची होणार विशेष चाचणी)
रोहित शर्माचा आतापर्यंत असा आहे विक्रम
रोहित शर्माने आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत एकूण 22 सामने खेळले आहेत. त्याने 46.56 च्या सरासरीने आणि 84.94 च्या स्ट्राइक रेटने 745 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 1 शतक आणि 6 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 111* धावा आहे. त्याने आतापर्यंत 22 सामन्यांमध्ये 60 चौकार आणि 17 षटकार मारले आहेत.
2018 मध्ये केल्या होत्या सर्वाधिक धावा
रोहित शर्माने 2018 आशिया कपमध्ये वैयक्तिक सर्वाधिक धावा केल्या. त्याने 2018 मध्ये 5 सामन्यात 105.66 च्या सरासरीने 317 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतक आणि 1 शतक झळकले. रोहितचा हा आशिया चषक सर्वोत्कृष्ट ठरला, कारण गेल्या चार आशिया चषकांमध्ये रोहितला आपला फार्म दाखवता आला नाही. त्याने 2008 मध्ये 6 सामन्यात 116 धावा केल्या होत्या, त्यानंतर 2010 मध्ये 4 सामन्यात 132 धावा केल्या होत्या. तर 2012 मध्ये रोहितने 3 सामन्यात केवळ 73 धावा केल्या होत्या. याशिवाय 2014 साली रोहितने 4 सामन्यात 108 धावा केल्या होत्या.
भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 2008 ते वर्ष 2018 पर्यंत 5 वेळा एकदिवसीय फॉर्मेटमध्ये आशिया कप खेळला आहे. यासह रोहित आशिया कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे.