How to Watch IND vs SA 3rd Test Day 1: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका केप टाउन टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवसाचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

How to Watch IND vs SA 3rd Test Day 1: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका  (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील निर्णायक तिसरा आणि अंतिम सामना आज, 11 जानेवारीपासून केप टाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स मैदानावर खेळला जाणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) बॉक्सिंग डे कसोटी 113 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पण दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून संघाला 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. आणि यजमान संघाने मालिकेत 1-1 ने बरोबरीत साधली. भारताने आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत आता तिसरी कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर इतिहास रचण्याची संधी त्याच्याकडे आहे. भारत विरुद्ध दक्षिण केप टाउन कसोटी (Cape Town Test) सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे. (IND vs SA 3rd Test 2022: निर्णायक केप टाउन कसोटीतून मोहम्मद सिराजची एक्झिट, विराट कोहलीने डाया त्याचा फिटनेस अपडेट)

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत तिसरा कसोटी सामना मंगळवार, 11 जानेवारीपासून केप टाउनमधील न्यूलँड्स येथे खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत तिसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:00 वाजता सुरू होईल. तर पहिल्या दिवशी दुपारी 1:30 वाजता नाणेफेक होईल. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत तिसरा कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारतीय चाहत्यांसाठी थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच कसोटी सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, प्रियांक पांचाळ, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव.

दक्षिण आफ्रिका संघ: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगर पीटरसन, रॅसी व्हॅन डर डुसेन, टेंबा बावुमा, सारेल एरवी, जॉर्ज लिंडे, मार्को जॅन्सन, विआन मुल्डर, प्रिनेलन सुब्रेन, काइल वेरेन (यष्टीरक्षक), रायन रिकेल्टन, कगिसो राबाडा, लुंगी एनगिडी, ब्यूरन हेंड्रिक्स, केशव महाराज, ग्लेंटन स्टुअरमन, सिसांडा मॅगाला आणि डुआन ऑलिव्हियर.