How to Download Hotstar & Watch SRH vs RR IPL 2021 Match Live: सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार कसे डाउनलोड कराल? संपूर्ण प्रक्रिया घ्या जाणून
केन विल्यमसन (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) 40व्या सामन्यात आज (27 सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आज आमने-सामने येणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. हैदराबादच्या संघाचे नेतृत्व केन विल्यमसन करीत आहे. तर, राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी संजू सॅमसन संभाळत आहे. दरम्यान, कोरोना निर्बंधांखाली आयपीएलचे 14 वे हंगाम पार पडत आहे. अशास्थितीत लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंगसाठी Disney+ Hotstar हा प्रेक्षकांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे. हे देखील वाचा- IPL 2021: तळाशी बसलेल्या SRH चा खेळ अद्याप बाकी, 9 पैकी 8 सामने गमावल्यानंतरही आहे प्लेऑफच्या शर्यतीत, जाणून घ्या समीकरण

अँड्रॉइड फोन यूजर्स त्यांच्या स्मार्टफोनमध्ये हॉटस्टार अॅप दोन प्रकारे डाउनलोड करू शकतात. पहिला पर्याय म्हणजे प्लेस्टोअरवरून अॅप डाउनलोड करणे, तर दुसरा पर्याय म्हणजे वेबस्टॉवरवरून हॉटस्टार APK डाऊनलोड करून इंस्टॉल करणे. तुमच्या मोबाईलमध्ये हॉटस्टार असे डाउनलोड करा:

1. मोबाइलमध्ये हॉटस्टार डाऊनलोड करणे खूप सोपे आहे. पहिले तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जा आणि तिथे हॉटस्टार शोधा.

2. त्यानंतर इंस्टॉल पर्यायावर जा आणि तुमच्या फोनमध्ये इंस्टॉल अॅपवर क्लिक करा.

3. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अॅप्लिकेशन मेनूमध्ये किंवा होम स्क्रीनवर हॉटस्टार अॅप आयकॉन दिसेल.

4. यानंतर तुम्ही तुमच्या Gmail किंवा फेसबुक खात्यात साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन साइन अप करून अॅप उघडू शकता.

5. तुम्ही साइन इन करताच, तुम्ही हॉटस्टारवर थेट व्हिडिओ, क्रीडा कार्यक्रम जसे IPL, टीव्ही शो, चित्रपट आणि बरेच काही पाहू शकता.

हॉटस्टार हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. आयपीएल 2021 सामने लिव्ह स्ट्रीम करू शकतात आणि इतर क्रीडा कार्यक्रम, चित्रपट, टीव्ही शो देखील पाहू शकतात. आयपीएल 2021 मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाईन पाहण्यासाठी, तुम्हाला पॅकसह सदस्यता घ्यावी लागेल. यूजर्स हॉटस्टारच्या वेबसाइटवर आयपीएल 2021 सामने देखील पाहू शकतात.