How to Download Hotstar & Watch PBKS vs RR IPL 2021 Match Live: पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार कसे डाउनलोड कराल? घ्या जाणून
क्रिस गेल, किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

पंजाब किंग्स (Panjab Kings) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात आज (21 सप्टेंबर) आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील (IPL 14) 32वा सामना खेळला जाणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना रंगणार आहे. पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व केएल राहुल करीत आहे. तर, संजू सॅमसन याच्याकडे राजस्थान रॉयल्स संघाची जबाबदारी सोपण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना निर्बंधांखाली आयपीएलचे 14 वे हंगाम पार पडत आहे. अशास्थितीत लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंगसाठी Disney+ Hotstar हा प्रेक्षकांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

Disney+ Hotstar यंदा देखील आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. पंजाब आणि राजस्थान यांच्यातील आयपीएलचा 31 वा सामना लाईव्ह प्रसारित करणार आहेत. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Diseny+ Hotstar डाउनलोड करू शकता. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाइव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल. तर, Apple मोबाईल यूजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. Disney+Hotstar डाउनलोड करण्यासाठी आपल्याला खालील सोप्प्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. हे देखील वाचा- CSK vs MI IPL 2021 Match 30: मैदानात उतरताच Jasprit Bumrah ने लगावले अनोखे ‘शतक’, विराट-पोलार्डच्या क्लबमध्ये केला प्रवेश

1. हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. आपल्या प्ले स्टोअर वर जा आणि हॉटस्टार शोधा.

2. मग इन्स्टॉल पर्यायवर जाऊन क्लिक करा आणि आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

3. आता, आपल्या अ‍ॅप्लिकेशन मेनूमध्ये किंवा होम स्क्रीनवर आपल्याला एक हॉटस्टार अ‍ॅपचे चिन्ह दिसेल.

4. आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटने साइन इन करुन अ‍ॅप उघडू शकता किंवा आवश्यक तपशील प्रदान करून साइन अप करू शकता.

5. आता आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा स्पर्धा जसे की आयपीएल, टीव्ही शो, चित्रपट आणि बरेच काही पाहू शकता.

हॉटस्टार अ‍ॅपद्वारे आपण आजचा सामना लाइव्ह आपल्या मोबाईलवर पाहू शकता. आपण आपल्या फोनवर सहजपणे हा अ‍ॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. आयपीएलचे सामने यंदा हॉटस्टार हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, पंजाबी आणि मराठी अशा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.