राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: File Image)

RR vs RCB IPL 2020 Live Match: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सत्रात शनिवार, 16 ऑक्टोबर रोजी दोन सामने खेळले जाणार आहेत. पहिला सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai Internatioanl Stadium) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांचा त्यांच्या मागील सामन्यात पराभव झाला आहे. राजस्थानचा दिल्लीने पराभव केला, तर आरसीबीचा (RCB) पंजाबने पराभव केला. पॉईंट टेबलमध्ये आरसीबीच्या खात्यात 10 गुण आहेत, तर राजस्थान रॉयल्सच्या खात्यात केवळ सहा गुण आहेत. आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स, दोन्ही संघ आज आयपीएलमध्ये आपला 9वा सामना खेळतील. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात राजस्थानने दणदणीत सुरुवात केली, परंतु त्यानंतर संघाची गाडी विजयी रुळावरून भटकली तर आरसीबीने आजवर चांगली कामगिरी केली आहे. आरसीबीने आठपैकी पाच सामने जिंकले आहेत तर तीन सामने त्यांनी गमावले आहेत. (IPL 2020 Points Table Updated: मुंबई इंडियन्सने KKR विरुद्ध विजयानंतर गुणतालिकेत मिळवले अव्वल स्थान, पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल)

कोरोना व्हायरसचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग आयपीएल यंदा भारताऐवजी युएईमध्ये खेळवली जात आहे. जर तांत्रिक अडणींनीमुळे तुम्हाला या लीगमधील सामने टीव्ही पाहता येत नसेल तर, चिंता करण्याची गरज नाही. आपण डिस्नी+ हॉटस्टार अ‍ॅप वर आयपीएल लाइव्ह पाहू शकतात. हॉटस्टार यावर्षी आयपीएलचा स्ट्रीमिंग पार्टनर आहे. अशा स्थितीत, डिस्नी+ हॉटस्टारवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रंगणारा आजचा सामना देखील पाहता येणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल.

पाहा हॉटस्टार डाउनलोड करण्याची पद्धत:

1. प्रथम, आपल्या मोबाईमधील इंटरनेट सुरु करा आणि प्ले- स्टोर उघडून हॉटस्टार ऍप शोधा.

2. यानंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जाऊन हॉटस्टार ऍप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करा.

3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या मोबाईलच्या मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकतात.

5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहता येणार आहे.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.