चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या 14 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना शुक्रवारी सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) होईल. आयपीएलमध्ये (IPL) आजवरच्या संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांनी आजवर अनुक्रमे एक विजय आणि दोन सामने गमावले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबादचा संघ 2 (-0.228) गुणांसह सातव्या स्थानावर आहे तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ 2 (-0.840) गुणांसह आठव्या स्थानावर आहे. एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात पाच गडी राखून विजय मिळवला, त्यानंतर सुपर किंग्जला पुढील दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन सलामी फलंदाज डेविड वॉर्नरच्या (David Warner) नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादला या मोसमातील पहिल्या आणि दुसर्‍या सामन्यात रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. यानंतर, तिसर्‍या सामन्यात संघाने दिल्ली कॅपिटलस विरूद्ध 15 धावांचा रोमांचक विजय मिळविला. (CSK vs SRH, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

कोरोना व्हायरसमुळे यंदा आयपीएलचा 13वा हंगाम भारताऐवजी युएईमध्ये खेळला जात आहे. जर आपणास काही कारणास्तव टीव्हीवर आयपीएलचा आनंद घेता येत नसेल तर आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएलची मजा घेऊ शकता. डिस्नी+ हॉटस्टारवर चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आजचा सामना आपण पाहू शकता. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

आपल्या मोबाइल फोनमध्ये हॉटस्टार डाउनलोड कसे करावे:

1. मोबाइलमध्ये हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. पहिले आपल्या मोबाइलच्या प्ले-स्टोअरवर जा आणि तेथे हॉटस्टार शोधा.

2. नंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जा आणि आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या अ‍ॅप्स मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर आपल्याला हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकता.

5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहू शकता.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.