IND vs BAN 1st T20I: कसोटीनंतर आता भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका (IND vs BAN T20I Series 2024) होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेर येथे होणार आहे. यासाठी टीम इंडियाची (Team India बीसीसीआयने आधीच घोषणा केली होती, आता भारतीय संघ ग्वाल्हेरलाही पोहोचला आहे. कसोटीतील पूर्णपणे बदललेला संघ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मालिका सुरू होण्यापूर्वी, भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत किती टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कोणाची आकडेवारी आहे वरचढ आपण जाणून घेवूया...
हेड टू हेड आकडेवारी
भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 13 सामने जिंकले आहेत, तर एकच सामना बांगलादेश संघाने जिंकला आहे. याचा अर्थ आगामी मालिका टीम इंडियासाठी फारशी आव्हानात्मक नसली तरी भारताला काळजी घ्यावी लागणार हे निश्चित आहे. क्रिकेटची खास गोष्ट म्हणजे फॉरमॅट जितका लहान असेल तितका कोणत्याही संघाला हरवण्याची क्षमता जास्त असते.
हे देखील वाचा: IND vs BAN T20I Series 2024: बांगलादेशच्या कर्णधाराने भारताला दिले आव्हान, म्हणाला- कोणत्याही किंमतीत टी-20 मालिका जिंकणारच
2019 मध्ये बांगलादेशने प्रथमच टीम इंडियाविरुद्धचा पहिला सामना जिंकला
2009 पासून भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-20 सामने खेळले जात आहेत. पण हे 2019 साली पहिल्यांदाच घडले, जेव्हा बांगलादेश संघाने भारतीय संघावर विजय नोंदवला होता. तेव्हा रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार होता. हा सामना दिल्लीत खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. बांगलादेशने हे लक्ष्य 19.3 षटकांत केवळ तीन विकेट्स गमावून पूर्ण केले. त्यानंतर बांगलादेशला कधीही टीम इंडियाला हरवता आलेले नाही.
टीम इंडिया बांगलादेशचा करणार सफाया
भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्याच्या तयारीत आहे. यामध्ये भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने बांगलादेशला ज्या प्रकारे पराभूत केले त्यानंतर सूर्या टी-20 मालिकेतही अशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. पण या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.