Highest Tax-Paying Celebrity in India: चित्रपट जगतापासून ते क्रीडा जगतापर्यंत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे. स्टार्स अनेकदा त्यांच्या नेट वर्थमुळे चर्चेत राहतात. आता 2024 वर्ष संपणार आहे आणि नवीन वर्ष 2025 लवकरच सुरू होणार आहे. अशात या वर्षी सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींची यादी (Highest Tax Paying Celebrity) समोर आली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये देशातील सर्वाधिक कर भरणारा सेलिब्रिटी दुसरा-तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आहे. शाहरुख खानने 2023-24 या आर्थिक वर्षात अभिनेता अक्षय कुमारला मागे टाकले आहे. शाहरुख खानने 2024 या आर्थिक वर्षासाठी 92 कोटी रुपयांचा कर भरला आहे. तो सर्वाधिक कर भरणारा भारतीय सेलिब्रिटी बनला आहे. त्यांची एकूण संपत्ती 7300 कोटी रुपये आहे.
तामिळ सुपरस्टार थलापथी विजय 80 कोटींच्या कर भरणासह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 800 कोटी रुपये आहे. या वर्षी सर्वाधिक कर भरणाऱ्या इतर सेलिब्रिटींबद्दल बोलायचे तर अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांचा या यादीतील टॉप-5 मध्ये समावेश आहे. ही यादी फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार आहे. (हेही वाचा: Pushpa 2 Worldwide Box Office Collection: 'पुष्पा 2' ने सर्वात जलद 800 कोटी रुपयांची कमाई केली, हा टप्पा गाठणारा पहिला भारतीय चित्रपट)
वर्ष 2024 मध्ये सर्वाधिक कर भरणारे टॉप 10 सेलिब्रिटी-
शाहरुख खान- 92 कोटी
थलपथी विजय- 80 कोटी
सलमान खान- 75 कोटी
अमिताभ बच्चन- 71 कोटी
विराट कोहली- 66 कोटी
अजय देवगण- 42 कोटी
एमएस धोनी- 38 कोटी
रणबीर कपूर- 36 कोटी
सचिन तेंडुलकर- 28 कोटी रुपये
हृतिक रोशन- 28 कोटी रुपये
या सेलिब्रिटींनीही भरला आहे कोट्यावधींचा कर-
यासोबतच टॉप 20 बद्दल बोलायचे झाले तर या यादीत कपिल शर्मा 26 कोटी रुपये, सौरव गांगुली 23 कोटी रुपये, करीना कपूर 20 कोटी रुपये, शाहिद कपूर 14 कोटी रुपये आहेत. तर, मोहनलाल 14 कोटी, अल्लू अर्जुन 14 कोटी, हार्दिक पंड्या 13 कोटी, कियारा अडवाणी 12 कोटी, कतरिना कैफ 11 कोटी आणि पंकज त्रिपाठी यांनी 11 कोटीचा कर भरला आहे.