Pushpa 2 Worldwide Box Office Collection: पुष्पा 2 ने अवघ्या 4 दिवसांत जगभरात 800 कोटींचा टप्पा ओलांडून एक नवा टप्पा गाठला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांच्या अधिकृत इन्स्टा हँडलवरील पोस्टरमध्ये असे लिहिले आहे की, "पुष्पा 2 हा करून 800 कोटी रुपयांचा टप्पा पार करणारा सर्वात जलद भारतीय चित्रपट ठरला आहे." (हेही वाचा - Pushpa 2 - The Rule: 'पुष्पा 2 - द रुल' ने फक्त 3 दिवसांत 600 कोटींचा ओलांडला टप्पा; आंतरराष्ट्रीय स्तरावर जलद कमाई करणारा ठरला चित्रपट)
पाहा पोस्ट -
View this post on Instagram
पुष्पा 2 ने सर्वात कमी वेळेत 800 कोटींचा टप्पा पार केला
पुष्पा 2 ने सर्वात कमी वेळेत 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. याआधी अनेक मोठ्या चित्रपटांनी हा आकडा गाठण्यासाठी यावेळी दुप्पट आणि तिपटीने जास्त वेळ घेतला होता.
रणबीर कपूरच्या ॲनिमलने 16 दिवसांत 800 कोटींची कमाई केली होती. शाहरुख खानच्या जवानाला 11 दिवस लागले तर पठाणला 12 दिवसांचा जगभरातील 800 कोटींचा जादुई आकडा गाठायला लागला. तर ज्युनियर NTR च्या RRR ला या टप्प्यावर पोहोचण्यासाठी 9 दिवस लागले.
पुष्पा 2 चे बजेट
पुष्पा 2 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटाने ज्या प्रकारे अवघ्या 4 दिवसांत 829 कोटींचा आकडा गाठला आहे, ते पाहता येत्या काही दिवसांत तो 1000 कोटींचा आकडाही गाठेल असे वाटते.
याशिवाय भारतीय बॉक्स ऑफिसवर चित्रपटाच्या कमाईवर नजर टाकली तर दिग्दर्शक सुकुमार यांच्या चित्रपटाने आतापर्यंत 550 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
पुष्पा 2 ची स्टारकास्ट
मागील चित्रपटाप्रमाणे, अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांनी 2021 च्या सुपरहिट चित्रपट पुष्पाचा सिक्वेल असलेल्या पुष्पा 2 मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक सुकुमार यांनी केले आहे ज्यांनी यापूर्वी अल्लू अर्जुनसोबत 3 सुपरहिट चित्रपट दिले होते.