India WTC Qualification Scenarios: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना (IND vs NZ 2nd Test 2024) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 113 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे न्यूझीलंडने भारतीय भूमीवर मालिका जिंकून इतिहास रचला. त्याचवेळी भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघ दुसऱ्या डावात 255 धावांवर ऑलआउट झाला. यासह पाहुण्या संघाने भारतासमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघ 60.2 षटकात 245 धावांवर गारद झाला. या पराभवानंतर टीम इंडियाला (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम (ICC World Test Championship Final) फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला किती मॅचेस जिंकावे लागतील हे या रिपोर्टमध्ये पाहूया.
View this post on Instagram
आता टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागतील?
आयसीसीच्या अहवालानुसार भारताला आता पुढील 6 पैकी किमान 4 सामने जिंकावे लागतील. यामध्ये भारत न्यूझीलंडविरुद्ध अजुन 1 कसोटी सामना घरच्या मैदानावर खेळायचा आहे. तर, संघाला 5 सामने परदेशी भूमीत म्हणजे ऑस्ट्रेलियात खेळायचे आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल-2 मध्ये असणे आवश्यक आहे. भारताने 4 सामने जिंकले आणि 1 सामना अनिर्णित राहिला तरीही संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. (हे देखील वाचा: India vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये, खेळाडूंसाठी कडक आदेश केला जारी)
View this post on Instagram
4 संघांमध्ये पाहायला मिळणार रंजक लढत
पुणे कसोटीपूर्वी भारतीय संघ 68.06 पीसीटीसह अव्वल होता, पण भारताचा पीसीटी 62.82 झाला आहे. भारतानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. 62.5 पीसीटीसह भारतानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. अशा प्रकारे भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये फारच कमी अंतर उरले आहे. त्याचवेळी भारतीय संघाचा पराभव आणि न्यूझीलंडच्या विजयामुळे श्रीलंकेच्या संधी सुधारल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंका 55.56 पीसीटीसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड 50 पीसीटीसह चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आता अशा प्रकारे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत 4 संघांमध्ये रंजक लढत पाहायला मिळत आहे.