ICC World Test Championship 2023-25: कानपूर कसोटीत (Kanpur Test) टीम इंडियाने (Team India) बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव करत कसोटी मालिका 2-0 अशी (IND Beat BAN 2nd Test) जिंकली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन बळी घेत बांगलादेशचा दुसरा डाव 146 धावांवर आटोपला. अशाप्रकारे भारताला 95 धावांचे लक्ष्य मिळाले, जे संघाने तीन गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह टीम इंडियाने (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम (ICC World Test Championship Final) सामन्यावरील आपला दावा आणखी मजबूत केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मॅचमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला किती मॅचेस जिंकावे लागतील हे या रिपोर्टमध्ये सांगू.
आता टीम इंडियाला किती सामने जिंकायचे आहेत?
आयसीसीच्या अहवालानुसार भारताला आता पुढील 8 पैकी किमान 5 सामने जिंकावे लागतील. यामध्ये भारत न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी सामने त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. तर, संघाला 5 सामने परदेशी भूमीत म्हणजे ऑस्ट्रेलियात खेळायचे आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल-2 मध्ये असणे आवश्यक आहे. भारताने 4 सामने जिंकले आणि 1 सामना अनिर्णित राहिला तरीही संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. (हे देखील वाचा: IND vs BAN T20 Schedule: भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 ऑक्टोबरपासून टी 20 मालिका; कुठे, कधी होणार सामने? पहा वेळापत्रक)
India firmly holds the top spot in the World Test Championship points table after a 2-0 series victory 🇮🇳🔝
Meanwhile, Bangladesh drops to seventh place in the standings 🇧🇩🔻#India #Bangladesh #WTC #Tests #Sportskeeda pic.twitter.com/tKmhhtr9K7
— Sportskeeda (@Sportskeeda) October 1, 2024
WTC पॉइंट टेबलवर भारताची पकड मजबूत
कानपूर कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडिया 71.67 टक्के विजयासह अव्वल स्थानावर होती आणि आता टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 74.24 झाली आहे. आतापर्यंत भारताने वेस्ट इंडिजचा 1-0 ने तर इंग्लंडचा 4-1 ने पराभव केला होता. आता टीम इंडियाने बांगलादेशला कसोटीत 2-0 ने पराभूत करून आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला सध्या न्यूझीलंडविरुद्ध 3 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 कसोटी सामने खेळायचे आहे. टीम इंडियाने आतापर्यंत फक्त दक्षिण आफ्रिकेसोबत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. टीम इंडियाने या मोसमात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.
इतर संघांची काय आहे स्थिती?
या सामन्यापूर्वी बांगलादेशचा संघ 39.29 टक्के विजयासह पाचव्या स्थानावर होता आणि आता तो सातव्या स्थानावर घसरला आहे. WTC 2025 च्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 62.50 आहे. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा संघ आहे, ज्याने न्यूझीलंडला पराभूत करून तिसरे स्थान मिळविले. श्रीलंकेची विजयाची टक्केवारी 55.56 आहे. इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 42.19 आहे. आणि पाचव्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 38.89 आहे