Team India (Photo Credit - X)

ICC World Test Championship 2023-25: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना (IND vs NZ 1st Test 2024) बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. यासह न्यूझीलंडने तीन कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य दिले होते. न्यूझीलंडने 27.4 षटकात दोन विकेट गमावून लक्ष्य गाठले. या पराभवानंतर टीम इंडियाला (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम (ICC World Test Championship Final) फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला किती मॅचेस जिंकावे लागतील हे या रिपोर्टमध्ये पाहूया.

आता टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागतील?

आयसीसीच्या अहवालानुसार भारताला आता पुढील 7 पैकी किमान 5 सामने जिंकावे लागतील. यामध्ये भारत न्यूझीलंडविरुद्ध 2 कसोटी सामने त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. तर, संघाला 5 सामने परदेशी भूमीत म्हणजे ऑस्ट्रेलियात खेळायचे आहेत. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल-2 मध्ये असणे आवश्यक आहे. भारताने 4 सामने जिंकले आणि 1 सामना अनिर्णित राहिला तरीही संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल.

एका पराभवामुळे टीम इंडियाचे मोठे नुकसान

पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ 74.24 च्या विजयाच्या टक्केवारीसह अव्वल होता, परंतु आता पराभवानंतर संघाची विजयाची टक्केवारी 68.06 वर आली आहे. मात्र, त्यानंतरही भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया 62.50 विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. (हे देखील वाचा: IND vs NZ 1st Test 2024: छोट्या-छोट्या चुका केल्या, ज्याची शिक्षा मिळाली… बंगळुरूतील पराभवानंतर रोहित शर्माच स्पष्ट वक्तव्य)

इतर संघांची काय आहे स्थिती?

भारताचा पराभव करत न्यूझीलंड संघाने चौथ्या स्थानावर मजल मारली आहे. आता त्यांची विजयाची टक्केवारी 44.44 झाली आहे. तर इंग्लंड पाचव्या स्थानावर पोहचला असुन विजयाच्या टक्केवारी 43.06 झाली आहे. तसेच दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानावर असुन त्यांची विजयाची टक्केवारी 38.89 आहे. बांगलादेशचा संघ सातव्या स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी 34.38 आहे. पाकिस्तानची विजयाची टक्केवारी आता 25.93 वर पोहोचली आहे आणि वेस्ट इंडिज 18.52 टक्के सामने जिंकून शेवटच्या स्थानावर आहे. सध्या, केवळ भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता आहे. डब्ल्यूटीसी फायनल जून 2025 मध्ये इंग्लंडमध्ये खेळली जाईल.