KKR vs PBKS, IPL 2024 42th Match Stats And Record Preview: कोलकाता आणि पंजाब यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम
PBKS vs KKR (Photo Credit - X)

KKR vs PBKS, IPL 2024: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 42 वा (IPL 2024) सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज (KKR vs PBKS) यांच्यात खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या होम ग्राउंड ईडन गार्डन्स स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या मोसमात दोन्ही संघांची ही पहिलीच भेट असेल. पंजाब किंग्जसाठी हा सामना करा किंवा मरो असा होणार आहे. पंजाब किंग्जने या मोसमात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. या कालावधीत पंजाब किंग्जने 2 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. दोन विजयांसह पंजाब किंग्जच्या खात्यात केवळ 4 गुण आहेत. पंजाब किंग्ज संघाला प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर उर्वरित 6 सामने जिंकावे लागतील. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्सची या मोसमात आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.

दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी

आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्जविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा वरचष्मा राहिला आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 32 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत कोलकाता नाईट रायडर्सने 21 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्जने 11 सामने जिंकले आहेत. या मोसमातील दोन्ही संघांमधील ही पहिलीच लढत आहे. आयपीएलच्या शेवटच्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले. या कालावधीत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता. (हे देखील वाचा: KKR vs PBKS, IPL 2024 Pitch Report: कोलकात्याच्या खेळपट्टीवर कोण ठरणार वरचढ? गोलंदांज की फलंदांज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल)

आजच्या स्पर्धेत होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम 

कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला इंडियन प्रीमियर लीगमध्ये 3000 धावा पूर्ण करण्यासाठी 34 धावांची गरज आहे.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनला 1000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 67 धावांची गरज आहे.

पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनला इंडियन प्रीमियर लीगमध्ये 100 झेल पूर्ण करण्यासाठी आणखी एका झेलची गरज आहे.

T20 क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फलंदाज नितीश राणाला 4500 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 13 धावांची गरज आहे.

T20 क्रिकेटमध्ये, कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार फलंदाज मनीष पांडेला 150 झेल पूर्ण करण्यासाठी फक्त एका झेलची गरज आहे.