Heinrich Klaasen

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू हेन्रिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे त्यामुळे आधुनिक क्रिकेटमधल्या एका दमदार फलंदाजाचा एक टप्पा संपला आहे. वयाच्या 33 व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर जात आहे. परंतू तो इंडियन प्रिमियर लीग (IPL), SA20 आणि इंग्लंड मधील The Hundred अशा आणि इतर जगभरातील राष्ट्रीय लीग्स मध्ये तो खेळत राहणार आहे. क्लासेन आफ्रिकेसाठी शेवटचा सामना मार्च महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळला — ही त्याच्या यशस्वी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची योग्य समाप्ती ठरली. आता क्लब पातळीवर त्याचे लक्ष असून, अजून 3 वर्ष खेळत राहण्याचा त्याचा इरादा आहे.

1xBet या बेटिंग कंपनीचा तो ब्रँड ॲम्बेसेडर हेन्रिख क्लासेनने , त्याने आपल्या चाहत्यांबरोबर आपले मनोगत मांडले आहे.

"माझ्यासाठी खूप निराशेचा दिवस आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या भविष्यासाठी काय योग्य असेल याचा निर्णय घ्यायला मला वेळ लागला", असे त्याने आपल्या निवृत्तिच्या संदेशात म्हटले होते.

कीर्तीच्या शिखराकडे झेप

क्लासेनने अत्यंत आक्रमक फलंदाज म्हणून क्रिकेट विश्वात नाव कमावले. जोरदार आक्रमक फटके मारण्याची आणि सामन्यांचा कल बदलण्याच्या त्याच्या क्षमतेने तो दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचा अविभाज्य भाग बनला, विशेषतः अलिकडच्या वर्ष.

क्लासेनच्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेंच्युरियन इथे त्याने केलेली 83 चेंडूत 174 धावांची खेळी होती. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील ती एक महान खेळी होती ज्यातून क्लासेनची शैली अधोरेखित झाली: निर्दयी, आत्मविश्वासू आणि पाहण्यास रोमांचक.करणारा खेळ करणारा फलंदाज. 2023 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य आणि 2024 टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरी पर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या वाटचालीत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

दबावाच्या परिस्थितीत हेन्रिकची गुणवत्ता अधिक जास्त उजळायची, जेव्हा संघाला कोणी तरी जोखिम घेणे आवश्यक असायचे आणि कठीण परिस्थितीत विजय खेळून आणायचा असेल तेव्हा तो संघाचा तारणहार बनायचा. तो त्या संघाचा महत्त्वाचा भाग होता, जिथे सर्व काही ठरायचं — जिंकलं किंवा हरलं, एकच चेंडू, एकच क्षण, एकच शॉट.

आत्ताच का?

निवृत्तीचा निर्णय क्लासेनसाठी तसा कठीण होता पण विचारपूर्वक होता. जसे तो सांगतो की वैयक्तिक परिस्थितीने महत्त्वाची भूमिका बजावली: “फक्त कुटुंब. सध्या प्रवास खूप होत आहे आणि मला माझ्या कुटुंबाला प्रथम स्थान द्यायचे आहे. जसे तुमचे वय वाढते तसे तुम्ही स्वत:ला जास्त ओळखू लागता आणि तुमच्या ताकदीनुसार खेळू लागता. मी आता परिपक्व झालो आहे त्यामुळे माझ्या खेळाला जास्त वेळ लागत नाही. आता मला माझ्या कुटुंबाला वेळ देणेही आवश्यक आहे याची जाणीव झाली”, असे तो 1xBet बरोबर बोलताना म्हणाला.

ही स्पष्ट कबुली अशा खेळाडूची परिपक्वता दाखवते जो आपल्या यशाने हुरळून जाऊन फक्त खेळातच गुंतून गेलेला नाही. तर तो आपल्या खेळात आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल साधत आहे.

ओळख आणि प्रभाव

गेल्या काही वर्षात आयपीएल मध्ये क्लासेन Sunrisers Hyderabad (सनरायझर्स हैदराबाद) संघाचा अविभाज्य भाग झाला आहे. 2024 मध्ये SRH प्लेऑफ अंतिम फेरीत पोहचले परंतु अजिंक्यपदापासून एक पाऊल दूर राहिले आणि हेन्रिक या यशाचा एक शिल्पकार होता.

"मी फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झालो आहे त्यामुळे भविष्यात आणखी काही IPL मध्ये खेळायची संधी मिळेल अशी मला आशा आहे. IPL एक उत्कृष्ट स्पर्धा आहे आणि दरवर्षी तिचा दर्जा उंचावत आहे त्यामुळे मी त्याचा आनंद घेतो", असे क्लासेन म्हणाला.

तो याचा आवर्जून उल्लेख करतो की Sunrisers (सनरायझर्स) मधील अभिषेक शर्मा आणि नितिश या दोन युवा गुणी खेळाडूंनी त्याला प्रभावित केले आहे आणि यांचे भविष्य उज्ज्वल आहे असे त्याला वाटते.

हेन्रिकला दोन सीझन पूर्वीचा एक क्षण आठवतो जो त्याच्या कारकिर्दीत अत्यंत महत्त्वाचा होता. तेव्हा तो आयपीएल मध्ये परतला होता आणि स्पर्धेत त्याची बॅट तळपल्याने कामगिरी अत्यंत प्रभावी झाली. त्याला असे वाटते की तिथे अनेक गोष्टी बदलल्या, फक्त आकडेवारी, त्याची कामगिरीच नाही तर त्याला क्रिकेटमधील आपल्या भूमिकेबद्दल जाणीव झाली.

क्लासेन हे मान्य करतो की IPL ने त्याला खेळाडू आणि एक व्यक्ती म्हणून बदलले आहे. "एक असा फलंदाज ज्याला गोलंदाजी करायला गोलंदाजांना आवडत नाही, जो पूर्ण त्वेषाने खेळतो परंतु मैदानात मात्र एक अत्यंत चांगला माणूस आहे", असे वर्णन तो करतो. "“आशा आहे की, मी तरुण मुलांना माझ्यासारखा क्रिकेट खेळण्याची प्रेरणा देऊ शकेन.” भविष्यात, जेव्हा त्याच्या कारकिर्दीचा शेवट होण्याची वेळ येईल, तेव्हा तो नवीन पिढीला आपला अनुभव देण्यासाठी प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून क्रिकेटमध्ये राहील, अशी शक्यता हेनरिक नाकारत नाही.

एक क्रीडापटू हा जगभरातील युवा खेळाडूंचा आदर्श असतो पण आजही तो ज्यांच्याकडून शिकला आणि ज्यांचा त्याच्यावर प्रभाव पडला त्यांना हेन्रिक विसरलेला नाही. तो डेव्हिड मिलर याचे आवर्जून नाव घेतो ज्याचा हेन्रिक नुसार त्याच्या खेळावर प्रचंड प्रभाव पडला आहे.

आता कुठे सुरवात करत असलेल्या, नावारूपाला येत असलेल्या युवा क्रिकेटपटूंना तो सल्ला देतो की घाई करू नका अथवा कोणताही अतिरेक करू नका. स्वत:ला ओळखणे महत्त्वाचे आहे आणि आपल्या मुल्यांशी एकरूप राहणे आवश्यक आहे. “कोणताही अतिरेक करू नका, स्वत:ला ओळखा आणि स्वत:शी प्रामाणिक राहा, सर्व गोष्टी सुरळीत होतील”, असा सल्ला हेन्रिक देतो.

जर त्याला त्याच्या आयुष्यातील एखादा सामना परत खेळण्याची संधी मिळाली तर तो कसोटी पदार्पण जास्त विचार न करता पटकन निवड करतो. तो आठवतो: “कसोटी पदार्पण, मला तिथे परत जायला आवडेल आणि पहिला फटका आधीपेक्षा व्यवस्थित खेळायला आवडेल पण तो जीवनाचा एक भाग आहे.”

पुढे काय?

पुन्हा एकदा हे अधोरेखित करणे महत्त्वाचे आहे: क्लासेन फक्त राष्ट्रीय संघाबरोबरची आपली कारकीर्द समाप्त करत आहे. क्लब पातळीवर त्याच्यासमोर अनेक आव्हान असणार आहेत. लवकरच तो IPL बरोबरच MLC, The Hundred आणि SA20 अशा स्पर्धांमध्ये खेळतच राहणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर गेल्यामुळे हेन्रिकला आपल्या कुटुंबाला अधिक वेळ देता येणार आहे आणि ज्या ऊर्जेमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावारूपाला आला ती ऊर्जा त्याला कुटुंबाला देता येणार आहे. 1xBet ने केलेल्या अलिकडच्या चाहत्यांच्या सर्वेक्षणानुसार क्लासेन IPL मधील 5 लोकप्रिय खेळाडूंमध्ये होता.

आपल्या आक्रमक आणि शैलीदार फलंदाजीने क्लासेनने चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. "तो माझा आदर्श आहे आणि त्याची फलंदाजीचे फटके अद्भुत आहेत! अत्यंत शक्तिशाली फटकाबाजी" असे एका उत्साही चाहत्याने लिहिले. जेव्हा जेव्हा हेन्रिक मैदानात उतरतो तेव्हा त्याचा खेळ उच्च दर्जाचा असतो आणि त्याच्यात खऱ्या विजेत्याची मानसिकता असते. आपले आवडते संघ कोणतेही असले तरी क्रिकेट चाहते एक गोष्ट निःसंदिग्ध पणे मान्य करतात: "क्लासेन हा खरोखर चॅम्पियन आहे."

त्याची मजबूत देहयष्टी त्याच्या नैसर्गिक गुणवत्तेला पूरक ठरते. म्हणूनच तो सतत चाहते यांच्या लक्षात असतो: जसे एका चाहत्याने सांगितले, "मी त्याच्यावर बेट लावतो कारण तो सध्याचा सर्वोत्तम खेळाडू आहे.”

राष्ट्रीय संघाबरोबर भले तो आता क्रिकेट खेळणार नसला तरी त्याचे योगदान आकडेवारीच्या पलीकडे होते.त्याची शैली, खिलाडूवृत्ती आणि व्यक्तिमत्व याचा ठसा स्टेडियम,लॉकर रूम्स आणि चाहत्यांच्या मनात येणारी अनेक वर्ष कायम राहणार आहे.

"लोक त्याला कसे लक्षात ठेवतील?" असे विचारले असता, क्लासेन फक्त उत्तर देतो: "संघातील एक चांगला सहकारी आणि एक कौशल्यपूर्ण क्रिकेटपटू म्हणून." सुदैवाने चाहत्यांना त्याच्या खेळाचा आनंद घ्यायचे अनेक क्षण मिळणार आहेत भले ते राष्ट्रीय संघाबरोबर नसतील.

1xBet बाबत

1xBet ही जागतिक स्तरावर नामांकित बूकमेकर आहे ज्यांना सट्टा उद्योगात 18 वर्षांचा अनुभव आहे. या ब्रँडचे वापरकर्ते हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टा लावू शकतात, कंपनीची वेबसाईट आणि अॅप 70 भाषांमध्ये उपलब्ध आहेत. 1xBet कंपनीच्या आधिकारिक पार्टनर्स मध्ये FC Barcelona, Paris Saint-Germain, LOSC Lille, La Liga, Serie A, European Cricket Network, Durban Super Giants आणि इतर अनेक नामांकित स्पॉर्ट्स ब्रॅंड्स आणि संघटनांचा समावेश आहे. कंपनीच्या भारतातील ब्रॅंड अॅंबॅसिडर्स मध्ये हेन्रिक क्सालेन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा समावेश आहे. कंपनीला IGA, SBC, G2E Asia, आणि EGR अशा नामांकित आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.