
Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders, 25th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 25 वा सामना पाच वेळा विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs CSK) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई (MA Chidambaram Stadium, Chennai) येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ मागील सामन्यातील पराभव विसरुन मैदानात उतरणार आहे. या हंगामात, कोलकाताचे नेतृत्व अंजिक्य राहाणे (Ajinkya Rahane) करत आहे. तर, ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जची कमान पुन्हा एमएस धोनीच्या (MS Dhoni) खांद्यावर आहे. दरम्यान, चेन्नई संघाने पहिला सामना जिंकल्यानंतर सलग चार सामने गमावले आहेत, ज्यामुळे तो गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. दुसरीकडे कोलकाताने 2 सामने जिंकून तीन सामने गमावले असुन ते सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघामध्ये आजचा सामना रोमांचक पाहायला मिळू शकतो.
हेड टू हेड रेकॉर्ड (CSK vs KKR Head To Head Record In IPL)
आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. या काळात, चेन्नई सुपर किंग्जने वरचढ कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने 19 सामने जिंकले आहेत. तर, कोलकाता नाईट रायडर्सने फक्त 10 सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये एक सामना खेळवण्यात आला होता. या काळात चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला होता. कोलकाता नाईट रायडर्स हा सामना जिंकून त्यांची आकडेवारी सुधारू इच्छिते.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
चेन्नई सुपर किंग्ज : रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), आर अश्विन, नूर अहमद, मथिशा पाथिराना, खलील अहमद, मुकेश चौधरी/अंशुल कंबोज.
कोलकाता नाईट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंगक्रिश रघुवंशी, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मोईन अली/स्पेंसर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरविंद.