गुरूवारी अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 WC 2022) दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा (Team India) इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव झाला. रोहितच्या संघाला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलियातून न्यूझीलंडला (New Zealand) जाणार आहेत. तर या पैकी काही वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. हार्दिक पांड्याकडे न्युझीलंड टी-20 सामन्याचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. इतकंच नाही तर टीम इंडियाचे प्रक्षिशक राहुल द्रविड आणि संपूर्ण कोचिंग स्टाफही बदलला जाणार आहे, कारण त्यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण अँड कंपनी न्यूझीलंडला जाणार आहे.
T20 विश्वचषक गमावल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, सलामीवीर केएल राहुल, यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक, फिरकीपटू आर अश्विन, अष्टपैलू अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मायदेशी परतणार आहेत. यापैकी दिनेश कार्तिक आणि आर अश्विन यांची आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवड होणार नाही. (हे देखील वाचा: Sunil Gavaskar on India's Loss: भारताच्या लाजिरवाण्या पराभवावर सुनील गावस्कर यांनी तोडले मौन, म्हणाले- काही खेळाडू निवृत्त होतील)
3 सामन्यांची T20I मालिका
टीम इंडिया नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. 3 सामन्यांची T20I मालिका 18 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे खेळवला जाईल, तर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 25 नोव्हेंबरपासून ऑकलंडमध्ये सुरू होईल.
न्यूझीलंड T20I मालिकेसाठी भारतीय संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.