हार्दिक पांड्या (Photo Credit: Twitter)

IPL 2021 Auction: राष्ट्रीय निवडकर्त्यांना प्रभावित करण्यासाठीआणि भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठीरणजी ट्रॉफी आणि लिस्ट ए क्रिकेट हे पारंपरिक व्यासपीठ होते पण, गेल्या दशकात किंवा आताच्या काळात इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) प्रतिभा शोधण्याचे आणखी एक प्रमुख स्रोत बनले आहे. आयपीएल 2021 लिलाव (IPL Auction) सुरू होण्याच्या काही तास अगोदर भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आपला आणि त्याचा भाऊ क्रुणालच्या प्रवासाचा एक व्हिडिओ शेअर केला जिथे त्याने आयपीएलचे (IPL) आभार मानले. भारतात टी-20 लीगच्या आगमनाने अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. हार्दिकसह अनेक खेळाडूंसाठी आयपीएल एक व्यासपीठ ठरले आहे. चेन्नईत आयपीएल लिलाव सुरू होण्याच्या काही तास अगोदर गुरुवारी, हार्दिकने आयपीएलने दिलेल्या संधींना दोन्ही हातांनी कसे पकडले आणि क्रिकेटमध्ये स्वतःचे नाव कसे बनवले याचा एक व्हिडिओ शेअर केला. (IPL 2021 Auction Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग 14 लिलावाचे TV Telecast फ्री पहा Star Sports आणि Disney+Hotstar वर)

“तुमच्या स्वप्नांच्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नका. धन्य आणि कृतज्ञ. #IPLAuction आम्ही किती लांबचा प्रवास केला आहे याची नेहमी आठवण करून देतो,” असं हार्दिकने व्हिडिओला कॅप्शन दिले आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. हार्दिकने या व्हिडिओत म्हटले की इरफान पठाण आणि युसुफ पठाण यांच्याप्रमाणे बडोदा आणि टीम इंडियाकडून मी आणि क्रुणाल देखील खेळण्याचे माझेही स्वप्न आहे.  2015 मध्ये मुंबई इंडियन्सने 10 लाख बेस प्राईसवर खरेदी केल्यावर सुरतच्या क्रिकेटपटूने पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश केला. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, हार्दिकने यापूर्वी हंगामात नोंद केली होती पण, आठ फ्रँचायझीपैकी कोणीही त्याच्यासाठी बोली न लावल्यामुळे त्याला रिकाम्या हाती घरी परत जावे लागले होते.

आयपीएलमध्ये संधी मिळाल्यापासून हार्दिकने मागे वळून पाहिले नाही. त्याने भारतीय राष्ट्रीय संघासाठी 57 वनडे सामने, 43 टी -20 आणि 11 कसोटी सामने खेळले आहेत. आयपीएलची सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्ससाठी हार्दिकने 80 सामने खेळले आहेत. त्याचा भाऊ क्रुणालबद्दल बोलायचे तर त्याने 18 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले असून मुंबई इंडियन्ससाठी 71 सामने खेळले आहेत. 'पांड्या बंधू' अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचे सदस्य आहेत आणि टीम चॅम्पियन बनवण्यात या दोघांनी महतव भूमिका बजावली आहे.