IPL 2021 Auction Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग 14 लिलावाचे TV Telecast फ्री पहा Star Sports आणि Disney+Hotstar वर
File Image | आयपीएल लिलाव (Photo Credits: Twitter @IPL)

IPL 2021 Auction Live Streaming: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2021 हंगामाचा मिनी लिलाव आता काही तासांवर येऊन पोहचला आहे. चेन्नईमध्ये आज एकूण 291 खेळाडूंवर बोली लगावली जाईल. आयपीएल लिलावात (IPL Auction) सर्व आठ संघ त्यांच्या पथकांमध्ये भर घालण्यासाठी आज एकत्र येऊन लिलावात भाग घेतील. किंग्स इलेव्हन पंजाबकडे लिलावासाठी सर्वाधिक 53.20 पैसे शिल्लक आहेत तर लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला सर्वाधिक 13 जागा भरायच्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ सर्वात कमी 10.51 कोटी रुपयांसह लिलावात उतरतील. तीन रिक्त स्लॉट्ससह, SRH कडे 25-सदस्य संघ पूर्ण करण्यासाठी उपलब्ध स्पॉट्सची संख्या देखील कमी आहे. लिलावातून आठ संघ 291 खेळाडूंपैकी 61 खेळाडूंना आयपीएलचा करार मिळेल. दरम्यान हा लिलाव प्रक्रियेचा कार्यक्रम कुठे पार पडणार, किती वाजता सुरुवात होणार याबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. (IPL 2021 लिलावाच्या काही तासांपूर्वी 2 कोटी बेस प्राइस असलेल्या 'या' गोलंदाजाने घेतली माघार, जाणून घ्या कारण)

आयपीएल 2021 खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारी,गुरुवार रोजी चेन्नई येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 03:00 वाजता लिलावाला सुरुवात होईल. स्टार स्पोर्ट्स चॅनेल्सवर चाहते आयपीएल 2021 चा लिलाव लाईव्ह पाहू शकतात. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारतात इंडियन प्रीमियर लीगचे प्रसारण हक्क आहेत म्हणून चाहते स्टार स्पोर्ट्स 1/एचडी, स्टार स्पोर्ट्स 2/एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी/एचडी, स्टार स्पोर्ट्स 3/एचडी आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1/एचडी चॅनेलवर लिलाव लाईव्ह पाहता येईल. स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, केदार जाधव, हरभजन सिंह, शाकिब अल हसन आणि जेसन रॉय असे टॉप आंतरराष्ट्रीय खेळाडू या लिलावात उपलब्ध असतील.

दरम्यान, गुरुवारी आयपीएल 2021 लिलाव होणार आहे, तर स्पर्धेची एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासून होईल. मुंबई इंडियन्स आयपीएलचे गेतविजेते असून स्पर्धेची सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. अंबानीच्या मालकीच्या मुंबईने 5 वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहेत तर, चेन्नई सुपर किंग्सने 3 वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. आयपीएल लिलावात यंदा हजार खेळाडूंनी नोंदणी केली त्यापैकी 291 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. यामध्ये एकूण 164 भारतीय खेळाडू, 124 विदेशी आणि सहयोगी देशांचे 3 खेळाडूंचा समावेश आहे. 291 खेळाडूंपैकी जास्तीत जास्त केवळ 61 खेळाडूंना यंदा आयपीएलचा करार मिळेल.