India Vs New Zealand 3rd ODI 2019: कॉफी विथ करणच्या सहाव्या सीझनमध्ये (KWK6) वादग्रस्त वक्तव्यावरून अडचणीत आलेले के एल राहुल (KL Rahul) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय बीसीआयने (BCCI) काही दिवसांपूर्वी घेतला. त्यामुळे न्युझीलंडमध्ये झालेल्या तिसर्या सामन्यात हे दोन्ही खेळाडू सहभागी झाले होते. के.एल राहुल चार चमकदार कामगिरी करू शकला नसला तरीही हार्दिक पांड्या मात्र दोन गोष्टींमुळे चर्चेमध्ये होता. एक तर त्यांने हवेत झेपावत घेतलेला कॅच आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिखर धवनवर भडकलेला हार्दीकचा अंदाज.
Watch: Hardik Pandya loses his cool at Shikhar Dhawan for his bad throw#NZvIND #HardikPandya #ShikharDhawan pic.twitter.com/jJcZkWHOBG
— Mohsin Kamal (@64MohsinKamal) January 28, 2019
न्युझीलंडमध्ये माऊंट मॉनगनुई येथील बे ओव्हल (Bay Oval) मैदानावर टॉस जिंकत न्युझीलंड पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली. रॉस टेलरने हार्दीकच्या बॉलवर मिड विकेटच्या दिशेने शॉट लगावला. त्यावर धावत त्याने एक रन काढला. दुसरा रन काढण्यासाठी तो पुढे आला मात्र शिखरने बॉल उचलून फेकला.. मात्र त्याने फेकलेला बॉल कुणीच नीट पकडू शकला नाही त्यामुळे वैतागलेल्या हार्दिकने शिखरवर चिडून 'Come On Yaar'असे म्हटले. शिखरनेही ही चूक मान्य करत हात दाखवून माफी मागितली आणि हसून पुढे गेला. सध्या सोशल मीडीयावर हार्दिकची ही क्लिप व्हायरल होत आहे.
भारताने न्युझिलंड विरूद्धच्या 5 सामन्यांमध्ये सलग 3 सामने जिंकत वर्चस्व मिळवलं आहे. भारताने न्युझिलंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.मोहम्मद शामी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे. आता पुढील 2 सामन्यांसाठी विराट कोहलीला आराम देण्यात आला आहे. तर भारतीय क्रिकेट संघाची धुरा रोहित शर्माकडे देण्यात आली आहे.