विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) सामन्यात स्वत:च्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना पांड्याच्या पायाला (Hardik Pandya injury) दुखापत झाली होती. त्यामुळं मागील रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत मुंबईमध्ये पोहचणार आहे. पण तो श्रीलंकाविरोधात खेळण्याची शक्यता नाही. दोन नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये सामना होणार आहे. बीसीसीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या मुंबईमध्ये टीम इंडियासोबत जोडला जाणार आहे. सध्या तो एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत आहे.   (हेही वाचा - Mohammed Shami's World Cup Record: इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करून भारताचा सहावा विजय; पहा मोहम्मद शमीचे विश्वचषकातील विक्रम)

भारतीय संघात हार्दिक पंड्या अंतिम अकरा जणांमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण

हार्दिक पंड्या हा गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये आपले चांगले योगदान हे देतो. पांड्या सध्या बेंगळुरुमधील एनसीएमध्ये आपल्या फिटनेसवर काम करत आहे. मिळालेल्या वृत्तनुसार हार्दिक पांड्याच्या फिटनेसमध्ये सुधार आहे. तो खेळण्यासाठी तयारही झालाय. पण खबरदारी म्हणून त्याला आणखी आराम देण्यात येणार आहे.

उपकर्णधार हार्दिक पांड्याला पुण्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला दोन सामन्याला मुकावे लागले होते. न्यूझीलंड आणि इंग्लंडविरोधातील महत्वाच्या सामन्यात हार्दिक पांड्या उपलब्ध नव्हता.  मुंबईत श्रीलंकाविरोधात हार्दिक पांड्या खेळण्याची शक्यता कमीच आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरोधात पांड्या उपलब्ध असेल.