विश्वचषक स्पर्धेत भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 229 धावा केल्या, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ 129 धावा करून बाद झाला. यासह भारताने विश्वचषकात सलग सहावा विजय संपादन केला. रोहित शर्माला त्याच्या 87 धावांच्या खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मोहम्मद शमीने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 7 षटकात 22 धावा देत 4 बळी घेतले.
विश्वचषकात शमीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 13 सामन्यांत 14.07 च्या सरासरीने 40 विकेट्स घेतल्या आहेत. विश्वचषकात तो प्रत्येक 17 व्या चेंडूवर सरासरीने एक विकेट घेतो. सक्रिय खेळाडूंमध्ये विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाज आहे. विश्वचषकात झहीर खान आणि जवागल श्रीनाथ हे त्याच्यापेक्षा जास्त विकेट घेणारे एकमेव भारतीय आहेत. दोघांनी आपल्या नावावर 44-44 विकेट्स घेतल्या आहेत. (हेही वाचा: India Beat England, World Cup 2023: भारताचा इंग्लंडवर 100 धावांनी मोठा विजय, टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये प्रवेश)
Mohammed Shami's World Cup record is simply incredible 🌟 #CWC23 pic.twitter.com/pWjgOnAzjO
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)