Hardik Pandya (Photo Credit - Twitter)

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) आयपीएल 2023 च्या 18 व्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध (GT vs PBKS) गुरुवारी स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल सामन्यांना 3 तास ​​20 मिनिटांची मुदत असते. आयपीएल 2023 मध्ये अनेक सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटचा मुद्दा समोर येत आहे. अनेक सामने चार तासांपेक्षा जास्त कालावधीत पूर्ण झाले आहेत. आयपीएलने शुक्रवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “गुजरात टायटन्सचा आयपीएल आचारसंहितेअंतर्गत हंगामातील पहिला गुन्हा स्लो ओव्हर-रेटच्या संबंधात आहे. कर्णधार हार्दिक पंड्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आणखी दोन कर्णधारांना ठोठावण्यात आला आहे दंड 

आयपीएल 2023 मध्ये हार्दिक पांड्याआधीही दोन अन्य कर्णधारांना स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यांनाही 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. डु प्लेसिसला लखनौविरुद्ध तर सॅमसनला सीएसकेविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला होता. (हे देखील वाचा: KKR vs SRH Live Streaming: आज सनरायझर्स हैदराबाद कोलकाता नाइट रायडर्ससोबत भिडणार, सामना कधी आणि कुठे येणार पाहता)

गुजरातने पंजाबवर केली मात 

आयपीएल 2023 च्या 18 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा एक चेंडू बाकी असताना 6 विकेटने पराभव केला. मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 153 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने 19.5 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले.