Photo Credit- X

IPL 2025 MI vs GT: वानखेडे स्टेडियमवर काल मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एक रोमांचक सामना खेळवण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे झालेला हा सामना शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सने ३ विकेट्सने जिंकला. या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहराला (Ashish Nehra) दंड ठोठावण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिकला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सकडून असे घडण्याची ही दुसरी वेळ आहे आणि हार्दिकला दुसऱ्यांदा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, संघातील उर्वरित खेळाडूंना त्यांच्या सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

आशिष नेहरालाही दंड ठोठावला

दुसरीकडे, गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरालाही आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्या सामना शुल्काच्या 25% दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, त्याला या गुन्ह्यासाठी एक डिमेरिट पॉइंट देखील मिळाला आहे. "कलम 2.20 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा कबूल केला आहे. जो खेळाच्या भावनेविरुद्ध वर्तनाशी संबंधित आहे. आशिष नेहरालाने मॅच रेफरीची शिक्षा स्वीकारली आहे, असे आयपीएलच्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे.

मुंबई हरली होती

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 155 धावा केल्या. त्यानंतर, पावसाच्या व्यत्ययामुळे झालेल्या या सामन्यात, गुजरातसमोर डीएलएस पद्धतीने विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य होते. जे गुजरातने 19 षटकांत साध्य केले. या विजयासह गुजरात संघ पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.