हरभजन सिंह, संजू सॅमसन आणि गौतम गंभीर (Photo Credit: Getty, Facebook and PTI)

मागील अनेक वर्षापासून भारतीय संघ (Indian Team) चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाच्या शोधात आहे. विश्वचषकमध्ये देखील मधली फळी कमकुवत असल्याकारणाने टीम इंडियाचा अगदी मोक्याच्या क्षणी पराभव झाला. यादरम्यान, अनेक खेळाडूंनी 'या' क्रमांकासाठी विविध खेळाडूंचे पर्याय सुचवले. सध्या रिषभ पंत (Rishabh Pant) याला चौथ्या क्रमांकावरील भविष्यासाठीचा पर्याय म्हणून तयार केले जात आहे. पण अजून पंतला या क्रमांकावर फलंदाजी करताना यश आले नाही. पण, हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने दक्षिण आफ्रिका ए (South Africa A) विरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या वनडे मालिकेत प्रभावी खेळी करणाऱ्या संजू सॅमसन (Sanju Samson) याचे नाव टीम इंडियामध्ये चौथ्या क्रमांकाचा एक पर्याय म्हणून सुचवले आहे. भज्जीने ट्विटरद्वारे आपले मत प्रदर्शित करत म्हटले की, "वनडे मालिकेत संजू सॅमसन नंबर-4 साठी का नाही…त्याच्याकडे खेळाचे चांगले तंत्रज्ञान आहे, खेळाची समज आहे. आज दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध त्याने चांगली खेळी केली.” (विराट कोहली पाकिस्तानी संघात, पाकचा नापाक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, भारतीय चाहत्यांकडून सडेतोड प्रत्युत्तर)

हरभजनच्या ट्वीटवर माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने सहमती दर्शवत संजू चंद्रावरही फलंदाजी करू शकतो असे सांगून त्याचे कौतुक केले. गंभीरने लिहिले, "होय, हरभजन सध्याचे स्वरूप आणि क्षमता पाहता हा दक्षिण स्टार, संजू सॅमसन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरही फलंदाजी करू शकतो. मला आश्चर्य वाटते की फलंदाजाचा हा चमत्कार घडवून आणण्यासाठी विक्रमवर जागा आहे का? अद्भुत संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध 48 चेंडूत 91 धावा फटकावल्या."

दुसरीकडे, आपल्या मित्राच्या ट्विटला उत्तर देताना युवराज सिंह याने त्याची फिरकी घेत लिहिले की, "भारताची आघाडीची फळी मजबूत आहे भावा.. त्यांना चौथ्या क्रमांकावर फलंदाजाची गरज नाही." यासह युवराजने हसणारा इमोजी शेअर केले. दरम्यान, संजू दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध अंतिम सामन्यात 91 केल्या. त्याचे ९ धावांनी शतक हुकले पण, त्याच्या तुफानी खेळीमुळे भारत-अ संघाने पावसामुळे प्रभावित झालेल्या पाचव्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिका-एला 36 धावांनी पराभूत केले आणि मालिका 4-1 ने जिंकली.