
IPL 2025 Controversy: भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने रविवारी राजस्थान रॉयल्स (आरआर) आणि सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) यांच्यातील आयपीएल 2025 च्या सामन्यादरम्यान वांशिकदृष्ट्या असंवेदनशील टिप्पणी केल्यानंतर वाद निर्माण झाला. कॉमेंट्री करताना हरभजनने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची तुलना "काळी टॅक्सी" सोबत केली. या विधानावर सोशल मीडियावर लगेचच टीका झाली.
पहिल्या डावाच्या 18 व्या षटकात घडली जेव्हा आर्चर, इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांना गोलंदाजी करत होता. किशनने आर्चरला सलग चौकार मारल्यानंतर, हरभजनने ही टिप्पणी केली, “लंडन में काली टॅक्सी का मीटर तेज भागता है, और यहा पे आर्चर साहब का मीटर भी तेज भागा है”. म्हणजेच लंडनच्या काळ्या टॅक्सींच्या मीटरप्रमाणे, आर्चरचा मीटर जलद धावत आहे.
चाहत्यांना ही टिप्पणी आवडली नाही. अनेकांनी हरभजनला आयपीएल 2025 च्या कमेंट्री पॅनलमधून निलंबित करण्याची मागणी केली. माजी भारतीय क्रिकेटपटूंच्या टिप्पणीवर चाहत्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या. आर्चरला सामना खूप अडचणीचा गेला. त्याने एकही विकेट न घेता 76 धावा दिल्या. ही आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या गोलंदाजी कामगिरींपैकी एक होती.