Happy Janmashtami 2020: सचिन तेंडुलकर, युवराज सिंह व इतर टीम इंडिया खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा; दरवर्षी प्रमाणे दहीहांडी उत्सव न होण्याचा अजिंक्य रहाणेला खेद (See Tweets)
सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणे (Photo Credit: Facebook)

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) व इतर अनेक सध्याचे आणि माजी क्रिकेटपटूंनी कृष्णा जन्माष्टमीच्या (Janmashtami) चाहत्यांना शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. जन्माष्टमीचा सण देश-विदेशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदाही 11 आणि 12 ऑगस्ट रोजी दरवर्षी प्रमाणे दोन दिवस जन्माष्टमी साजरी केली जाईल. काही लोक श्री कृष्णाची जयंती मंगळवारी तर काही 12 ऑगस्ट रोजी साजरा करतील. दोन दिवस चालणारा हा उत्सव खूप खास आहे. या दिवशी सामान्य माणसापासून सेलिब्रिटीपर्यंत जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. भारतीय क्रिकेटपटूंनी यावेळी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर क्रिकेटर क्रुणाल पांड्या, हरभजन सिंह आणि आयपीएल फ्रॅंचायझींनी (IPL Franchises) देखील सर्वांना शुभेच्छा देत खास पोस्ट शेअर केली. (MS Dhoni Playing Bansuri: एमएस धोनीचा कृष्ण अवतार, CSK ने शेअर केला बासरी वाजविणारा जुना व्हिडिओ Watch Video)

भगवान श्रीकृष्णाच्या जन्माची नोंद म्हणून कृष्णा जन्माष्टमी साजरी केली जाते. क्रुणालने ट्विटरवर त्याच्या पोस्टवर लिहिले की “आज सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! कृपया सुरक्षित राहा.”

चेन्नई सुपर किंग्जने सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. सीएसकेने पोस्ट शेअर करताना लिहिले, ”जसे नेहमी म्हणतात, हे सर्व मनात आहे. तर त्यातील जास्तीत जास्त फायदा करून घ्या. शुभेच्छा #कृष्णजयंती! #WhistlePodu

"तुम्हाला आणि तुमच्या परिवारास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा," हरभजन सिंहने ट्विटरवर लिहिले आहे.

"जय कन्हैया लाल की," दिल्ली कॅपिटल्सने लिहिले.

भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने ट्विटरवर लिहिले की, "आपणा सर्वांना श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा".

भारतीय सलामीवीर फलंदाज शिखर धवननेही या शुभ प्रसंगी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. धवनने लिहिले, "आज तेथे असलेल्या सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा. सुरक्षित रहा".

माजी भारतीय फलंदाज युवराज सिंहने देखील कृष्णा जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. युवीने म्हटले,"तुम्हाला आणि तुमच्या परिवारास जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान श्रीकृष्ण सर्वांना आनंद आणि यशासह आशीर्वाद देतील! # कृष्णजन्माष्टमी".

मात्र, या सर्वांमध्ये मुंबईच्या अजिंक्य रहाणे मात्र निराश दिसला आणि त्यामागील कारणही तसच आहे. यंदा कोरोनाच्या प्रभावामुळे मुंबईमध्ये दहीहांडीचा उत्सव साजरा केला जाणार नाही. भारतीय टेस्ट संघाचा उपकर्णधार रहाणेनेही ट्विटरवर कृष्णा जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. रहाणेने लिहिले की, "सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा ... यावर्षी मुंबईत सामान्य दहीहंडी उत्सवाला मिस कारेन. घरी रहा, सुरक्षित रहा."

रवि शास्त्री

सुरेश रैना

व्हीव्हीस लक्ष्मण

इशांत शर्मा

मिताली राज

राहुल शर्मा

श्रेयस अय्यर

जन्माष्टमीच्या उत्सवामध्ये लोक श्रीकृष्णाच्या जीवनावर नृत्य नाटक करतात, मध्यरात्रीपर्यंत भक्तीगीते गातात आणि दिवसभर उपवास करतात. कृष्ण जन्माष्टमीम्हणून प्रसिद्ध गोकुळाष्टमी आणि श्रीकृष्ण जयंती भगवान विष्णूचा आठवा अवतार मानला जाणाऱ्या श्रीकृष्णाचा जन्म हिंदू कॅलेंडरनुसार भद्रपद महिन्यात कृष्णा पक्षाच्या आठव्या दिवशी साजरा केला जातो.